बॉयफ्रेंडने दिला धोका, तरुणीने दारूच्या नशेत फोडली विमानाची काच आणि...

बॉयफ्रेंडने दिला धोका, तरुणीने दारूच्या नशेत फोडली विमानाची काच आणि...

एका मुलीमुळे फ्लाइटचं इमर्जन्सी लँडिग करावी लागल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. कारण तिने रागामध्ये फ्लाइटमधील एक खिडकी रागारागाने तोडून टाकली आहे.

  • Share this:

चीन, 17 जून : एका मुलीमुळे फ्लाइटचं इमर्जन्सी लँडिग करावी लागल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. कारण तिने रागामध्ये फ्लाइटमधील एक खिडकी रागारागाने तोडून टाकली आहे. अशी माहिती समोर आली आहे की या मुलीने प्रेमभंग झाल्यामुळे रागात खिडकीवर मुक्के मारण्यास सुरूवात केली. द सनमधील बातमीनुसार ही घटना गेल्या महिन्यात चीनमध्ये लूंग एअरलाइन्समध्ये घडली. ली नावाच्या 29 वर्षीय मुलीचा स्वत:वरील ताबा सुटल्याने हा प्रकार घडला अशी माहिती एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 25 मे रोजी ही घटना घडली होती. याबाबत एनडीटीव्ही इंडियाने वृत्त दिले आहे.

चीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ली या तरूणीची फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ती आधी तिच्या सीटवर रडत बसली होती आणि त्यानंतर तिने काचांवर मुक्का मारायला सुरुवात केली. केबिन क्रूने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तिने खिडकीचा काही भाग तोडला होता. हे विमान यानचेंग शहरापासून जिनिंगपर्यंत प्रवास करणार होते. मात्र या घटनेमुळे त्यांना हेनानची राजधानी असणाऱ्या झेंग्झौमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. झेंग्झौ पोलिसांच्या माहितीनुसार तिच्या प्रियकराने तिला धोका दिल्यामुळे ती नाराज होती.  फ्लाइटमध्ये चढण्याआधी ती एक लीटर चीनी दारू देखील प्यायली होती. बायजी नावाच्या या दारूमध्ये 35 ते 60 टक्के अल्कोहोची मात्रा असते.

(हे वाचा-..तर येत्या 21 जूनला होणार जगाचा अंत? माया कॅलेंडरच्या दाव्यामागचे हे आहे सत्य)

ली ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुदैवाने या घटनेमध्ये कुणाला इजा झालेली नाही. तिच्या रक्तामध्ये 160 एमजी/100एमएल एवढी मात्रा आढळून आली. पोलिसांनी हे स्पष्ट नाही केलंय की तिला किती दिवस ताब्यात ठेवलं जाणार आहे.

First published: June 17, 2020, 10:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या