आग्रा-नोएडा 'एक्स्प्रेस वे' तब्बल 24 गाड्या एकमेकांवर आदळल्या !

आग्रा-नोएडा 'एक्स्प्रेस वे' तब्बल 24 गाड्या एकमेकांवर आदळल्या !

आग्रा - नोएडा एक्स्प्रेस वेवर आज पहाटे एक विचित्र अपघात झाला. त्यात तब्बल 24 गाड्या एकमेकांवर आदळल्या. भल्या पहाटेच्या दाट धुक्यामुळे हा विचित्र अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : आग्रा - नोएडा एक्स्प्रेस वेवर आज पहाटे एक विचित्र अपघात झाला. त्यात तब्बल 24 गाड्या एकमेकांवर आदळल्या. भल्या पहाटेच्या दाट धुक्यामुळे हा विचित्र अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

दिल्ली परिसरात सध्या दररोज सकाळी प्रचंड दाट धुकं पडतंय. त्यामुळे चालकांना समोरचं काहीच दिसत नाही, त्यामुळेच यमुना एक्स्प्रेसवर हा विचित्र अपघात झालाय. या अपघातादरम्यान अनेक प्रवासी जखमी झाले. शेवटी जखमी अवस्थेत प्रवासी एकमेकांचे जीव वाचवत होते. मागून येणाऱ्या गाडीला प्रत्यक्षदर्शी ओरडून सांगत होते.

एक वेळ तरी अशी आली की, धडकलेल्या गाडीतले उतरत नाहीत तोच पाठीमागून त्यांच्यावर पाठीमागून येणारी गाडी आदळली. अखेर धुकं विरळ झाल्यानंतर या सर्व गाड्या बाजुला काढून रस्ता मोकळा करण्यात आला. या अपघातात गाड्याचं मोठं नुकसान झाल्याचं बघायला मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 06:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading