मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

गणपती बाप्पा मोरया, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

गणपती बाप्पा मोरया, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

 कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील गजानन चव्हाण आणि त्यांची पत्नी मंगरुळपीर आगारात लाठी येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत होते.

कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील गजानन चव्हाण आणि त्यांची पत्नी मंगरुळपीर आगारात लाठी येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत होते.

मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 14 जुलै : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणातील (konkan) चाकरमान्यांना आता गणपती उत्सवासाठी (konkan ganpati festival) गावाकडे जाण्याचे वेध लागले आहे. त्यामुळेच चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने (st bus) यंदा 2200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, 16 जुलैपासून आरक्षण सुरू होणार आहे, अशी घोषणा परिवहण मंत्री ॲड. अनिल परब (anil parab) यांनी केली.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. ‍किंबहुना एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे 2200 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असं अनिल परब यांनी सांगितले.

आता नोकरीचं नो टेन्शन; 'या' कंपनीत ग्रॅज्युएट्ससाठी हजारो जागांसाठी होणार पदभरती

मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर 14 सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. 16 जुलै 2021 पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरू होईल. गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरू राहील. तर १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे, असंही परब यांनी सांगितलं.

पळून पळून किती पळणार! अशा ठिकाणी दिली कोरोना लस ज्याचा कुणी विचारही केला नसेल

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसंच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

First published: