मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'भाग जानेसे कुछ नही होगा...' मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार रिंकूची जादू; 200 चा टीजर प्रदर्शित

'भाग जानेसे कुछ नही होगा...' मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार रिंकूची जादू; 200 चा टीजर प्रदर्शित

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा (Rinku Rajguru) आगामी चित्रपट ‘200’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा (Rinku Rajguru) आगामी चित्रपट ‘200’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा (Rinku Rajguru) आगामी चित्रपट ‘200’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    मुंबई 29 जुलै : अभिनेत्री रिंकू राजगुरुचा (Rinku Rajguru) आगामी चित्रपट ‘200’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू आता केवळ मराठी पुरतीच मर्यादीत न राहता हिंदीतीलही एक ओळखीचा चेहरा बनत आहे. ‘सैराट’ चित्रपटापासून आपला प्रवास सुरू करणारी रिंकू त्यांनतर काही चित्रपटांत झळकली. मागील वर्षी ती ‘100’ या बेवसीरिजमध्ये दिसली होती. तर आता ‘200’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अभिनेत्री रिंकूसह, अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) आणि बरुण सोबती (Barun Sobati) हे ही दिसणार आहेत. दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता या चित्रपटाला दिग्दर्शित करणार आहेत. तर युडली फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. निर्मात्यांच्या मते चित्रपटाची कथा एका दलित महिलेची असून तिच्यासोबत झालेल्या अन्यायाविरोधातील लढा असणार आहे.

    'लग्नानंतरही कुंकू का नाही लावत?'; चाहत्याच्या प्रश्नावर दिशानं राहुलला ठरवलं दोषी

    चित्रपटाच्या टीझरमध्ये 200 महिला कोर्टाचा खटला सुरू असताना अचानक कोर्टाच्या दिशेने धावत येतात. तर आता ही गप्प बसण्याची वेळ नाही, पोलिसांना आपलं म्हणणं ऐकावचं लागेल. अशा पद्धतिचे डायलॉग कानावर पडत आहेत. त्यामुळे एका महिलेचा नाही तर अनेक महिलांचा लढा या चित्रपटातून दिसणार आहे.

    'डिम्पल गर्ल' गायत्री दातारचा पैठणी लुक; फोटो पाहून चाहते म्हणाले Beauty Queen

    ‘200’ मध्ये साहील खट्टर, इंद्रनिल सेनगुप्ता, उपेंद्र लिमये, सलोनी बात्रा हे देखील दिसणार आहेत. झी5 (Zee5) वर या चित्रपटाचा प्रिमियर होणार आहे. याविषयी झी5च्या हेड निमिशा पांडे म्हणाल्या की, “200 सारखी कथा असणाऱ्या चित्रपटाला झी5 (Zee5) सारखा प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं होतं. त्यामुळे ती जगापर्यंत पोहोचू शकते. व अशा धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकू शकते.” दरम्यान एका सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट असणार आहे.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Marathi entertainment, Rinku rajguru

    पुढील बातम्या