मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक! गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू; नजर चुकवून उतरले होते पाण्यात

धक्कादायक! गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू; नजर चुकवून उतरले होते पाण्यात

काही अतिउत्साही लोकं पोलिसांची नजर चुकुवून पोहण्यास जात आहेत

काही अतिउत्साही लोकं पोलिसांची नजर चुकुवून पोहण्यास जात आहेत

काही अतिउत्साही लोकं पोलिसांची नजर चुकुवून पोहण्यास जात आहेत

  • Published by:  Atharva Mahankal
चंद्रपूर, 15 ऑगस्ट: पावसाळा सुरु आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) येत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यातही (Dams) वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांच्या कालव्यांमध्येही भरपूर पाणी आहे. नागरिकांना इथे जाण्यास मनाई असतानाही काही हौशी आणि अतिउत्साही लोकं पोलिसांची आणि नागरिकांची नजर चुकुवून पोहण्यास जात आहेत. मात्र यामुळे काहींना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच एक घटना गोसेखुर्द धरणाच्या (Gosikhurda dam) कालव्यता घडली आहे. पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या या क्षेत्रात असोलामेंढा तलाव आहे तसंच गोसेखुर्द धरणाचा कालवा (Channel) आहे. या कालव्यात पोहण्यास बंदी आहे. त्यामुळे इथे नागरिकांना जाण्यास रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त आहे. मात्र तरीही सुरज नेवारे आणि सोनु सोरते या युवकांनी सुरक्षा व्यवस्थेची नजर चुकवून पाणी उडी घेतली. हे वाचा - Shocking! मुलाने तरुणीची काढली छेड तर आई-वडिलांनी जिवंत जाळलं या दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे सोनु पाण्यात बुडू लागला त्याला वर ओढण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सुरजही खोल पाण्यात उतरला. मात्र पाण्याची खोली जास्त असल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. बराच वेळ शोध घेऊन अखेर दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आलं. दोघांनाही प्राथमिक स्वास्थ केंद्र पाथरी येथे नेण्यात आलं. मात्र दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं. या दोघांचेहे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनाला पाठवण्यात आले आहेत.
First published:

Tags: Chandrapur

पुढील बातम्या