श्रीनगर, 25 सप्टेंबर : जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) च्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या (Security forces) च्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba)च्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे दहशतवाद्यांनी शोपिया इथं सचिवालयात तैनात असलेल्या जवानांवर फायरिंग केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षादलाला गुप्त माहिती मिळाली होती की, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा इथं काही दहशतवादी लपून बसले आहे. हे दहशतवादी मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या माहितीनंतर परिसरात सीमा सुरक्षादलाच्या जवानांनी धाव घेतली. त्यानंतर संपूर्ण परिसरात घेराव घालण्यात आला. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
गाण्यातून प्रेमाची व्याख्या सांगणारा अवलिया हरपला,नावावर 40000 गाण्यांचा रेकॉर्ड
सुरक्षा दलाच्या जवानांची शोध मोहिम सुरू असताना अचानक दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर देत जोरदार गोळीबार केला.
दहशतवादी पळून जावू नये म्हणून रात्रभर जवानांनी या परिसरात घेराव घालून ठेवला होता. त्यानंतर सकाळी दोन्ही लष्कर-ए-तोयबाच्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
शिवसेनेनं घेतली लहान भावाची भूमिका, राष्ट्रवादीला दिला मोठ्या भावाचा मान!
तर आज शुक्रवारी सकाळी शोपियांमध्ये सचिवालयाच्या गेटवर सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते. तेव्हा काही दहशतवाद्यांनी गेटवर येऊन थेट जवानांवर गोळीबार केला. जवानांवर गोळीबार केल्यानंतर लगेच घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.