Home /News /news /

क्रीडा विश्व हादरलं! भूस्खलनामुळे दोन भारतीय क्रिकेटपटूंचा जागीच मृत्यू, ढिगाऱ्याखाली सापडले शव

क्रीडा विश्व हादरलं! भूस्खलनामुळे दोन भारतीय क्रिकेटपटूंचा जागीच मृत्यू, ढिगाऱ्याखाली सापडले शव

रझिया 2011-12 पासून राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करीत होती.

    शिलाँग, 26 सप्टेंबर : क्रीडा विश्वाला हादरून सोडणारी एक बातमी सध्या समोर आली आहे. दोन भारतीय क्रिकेटपटूंच्या अपघाती मृत्यूमुळे क्रिकेट विश्वाला सगळ्या मोठा झटका बसला आहे. ही घटना मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात घडली. जेथे शुक्रवारी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात अनेक घरं दबली गेली, यात यात दोन महिला क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अन्य तीन बेपत्ता आहेत. ही माहिती तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. मवनेई भागातील सरपंच बह मुद यांनी 'पीटीआय-भाषा'ला दिलेल्या माहितीत, राष्ट्रीय स्तरावरील मेघालयचे प्रतिनिधित्व करणारी 30 वर्षीय रझिया अहमद आणि स्थानिक खेळाडू फिरोजिया खान यांचे मृतदेह ढिगाऱ्यात सापडले आहेत. वाचा-'मोदीजी आता तुम्हीच समजवा', धोनीच्या निर्णयावर सेहवागनं PMकडे मागितली मदत मेघालय क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस गिदियन खरकंगोर म्हणाले की, रझिया 2011-12 पासून राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करीत होती. ते म्हणाले की, रझियाने गेल्या वर्षी बीसीसीआयने आयोजित केलेल्या स्पर्धेत मेघालयाच्या वतीने भाग घेतला होता. वाचा-विराटचा पत्ता होणार कट, गंभीरनं सांगितलं कोण होणार टीम इंडियाचा पुढचा कर्णधार! रझियाच्या संघातील सह खेळाडूंनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिला क्रिकेटपटू काकोली चक्रवर्ती यांनी, रझियाची खूप आठवण येईल. तिच्या आत्म्यास शांती मिळेल यासाठी प्रार्थना करेन.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या