रतलाम(म.प्र), 16 मे : मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये (Ratlam Madhya Pradesh) एका अल्पवयीन मुलाचा त्याच्याच (Boy murdered) मित्रांनी खून केल्याचं समोर आलं आहे. मोबाइलवर फ्री फायर गेम (Free Fire Game) खेळण्यासाठी त्याला गावाबाहेर बोलावण्यात आलं. त्यानंतर खेळताना गेमच्या टास्कप्रमाणे (Mrdered using game task technique) त्याची मान वेगाने फिरवली, त्यात त्याच्या मानेचं हाड तुटलं आणि त्याचा मृत्यू झाला. याबाबत कुणालाही समजू नये म्हणून त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. मुलगा घरी पोहोचला नाही म्हणून त्याचा शोध घेतला, तेव्हा पोलीस चौकशीत आरोपी पकडले गेले. दोघांपैकी एकजण अल्पवयीन आहे.
(वाचा-आधी प्रेमाचं नाटक मग...; व्यावसायिकाचे अश्लील व्हिडीओ बनवून कोट्यवधींची मागणी)
रतलामच्या आलोटपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या दयालपुरा गावातील ही घटना आहे. मृत मुलाचं नाव विशाल सिंह असून तो अवघ्या 15 वर्षांचा होता. आरोपी उल्फत सिंह (18) आणि 16 वर्षांचा एका अल्पवयीन मुलगा हे त्याचे मित्र होते. तिघांना मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याची सवय होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशालचे वडील नेपाल सिंह यांनी त्यांचा मुलगा शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. रात्री 9 वाजता एक कॉल आल्यानंतर वहिणीला बाहेर जात असल्याचं सांगून तो गेला होता असं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर सगळीकडं रात्रभर शोधाशोध करूनही तो सापडला नाही. तक्रारीनंतर पोलिसांना गावात चौकशी सुरू केली. गावातील नागरिकांनी विशाल अखेरचा उल्फत आणि दुसऱ्या एका मित्राबरोबर बाईकवर जाताना दिसला होता, अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली तर ते फिरवाफिरवी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला.
(वाचा-क्षुल्लक कारणावरुन कुटुंबातील 4 जणांवर चाकू हल्ला; LIVE VIDEO आला समोर)
विशालने आरोपींची सिगारेट ओढणे, तंबाकू खाणे आणि मुलींशी संबंध असल्याचं त्यांच्या कुटुबीयांना सांगितलं होतं. आरोपी उल्फतने सांगितले की, या प्रकारामुळं तो विशालवर चिडलेला होता आणि त्याला बदला घ्यायचा होता. त्यामुळं त्यानं आधी विशालला गेम खेळण्यासाठी बोलवलं आणि बाईकवरून त्याला गावापासून लांब असलेल्या एकाठिकाणी नेलं. याठिकाणी त्यानं आधीच गड्डा करून ठेवला होता. गेममध्ये ज्याप्रकारे टास्क असतो तशाप्रकारे दोघांनी वेगाने विशालची मान गोल फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या मानेचं हाड तुटलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी मृतदेह खड्ड्यात पुरला आणि वर माती आणि दगड टाकले. भास्करनं हे वृत्त प्रकाशित केलं आहे.
पोलिसांनी दोघांना कोर्टात हजर केलं असता, एकाची तुरुंगात तर दुसऱ्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही गळ्याचं हाड तुटल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं. हा खून रागातून केला असला तरी त्यासाठी वापरलेली पद्धत ही गेममधून शिकलेली होती. त्यामुळं पुन्हा एकदा व्हिडिओ गेमचा मुलांच्या मानसिक स्थितीवर कशाप्रकारे वाईट परिणाम होतो हे समोर आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Madhya pradesh, Murder