Home /News /news /

खासगी बस ढाब्यावर थांबताच चोरट्यांनी साधला डाव, मिरची व्यापाराचे 18 लाख केले लंपास

खासगी बस ढाब्यावर थांबताच चोरट्यांनी साधला डाव, मिरची व्यापाराचे 18 लाख केले लंपास

मिरची विक्रीचे पैसे वसुलीकरून परतणाऱ्या हैरदराबादच्या व्यापाऱ्याला 18 लाखांचा 'तडका' बसला आहे.

कन्हैया खंडेलवाल,(प्रतिनिधी) हिंगोली,8 मार्च: मिरची विक्रीचे पैसे वसुलीकरून परतणाऱ्या हैरदराबादच्या व्यापाऱ्याला 18 लाखांचा 'तडका' बसला आहे. हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर खासगी बस ढाब्यावर थांबली असता चोरट्यांनी डाव साधत 18 लाखांची बॅग पळवली. या प्रकरणी रविवार (8 मार्च) हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता अकोला भागात पथके रवाना केली आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हैदराबाद येथील मिरची व्यापारी जी. श्रीनिवासराव हे अकोला येथील व्यापाऱ्यांना मिरची विक्री करतात. त्यानंतर मिरची विक्रीचे पैसे वसुलीसाठी जातात. नेहमी प्रमाणे श्रीनवासराव हे शनिवारी (7 मार्च) पैसे वसुलीसाठी हैदराबाद येथून अकोला येथे गेले होते. त्या ठिकाणी दोन व्यापाऱ्यांकडून एकूण आठरा लाख रुपयांची वसुली केली. यामध्ये एका मिरची व्यापाऱ्याकडून 7 लाख तर अन्य एका कडून 11 लाख रुपये वसुल केले. ही रक्कम एका बॅगमध्ये ठेऊन ते खासगी बसने अकोला येथून नांदेडकडे निघाले होते. हेही वाचा..ISISशी संबंधित पती-पत्नीला दिल्लीत अटक, आत्मघातकी हल्ल्याचा होता कट बसमध्ये ते बॅग उशाखाली घेऊन झोपले. कनेरगाव नाका ते हिंगोली मार्गावर एका ढाब्यावर रात्रीच्या वेळी बस जेवणासाठी थांबली होती. काही प्रवाशांनी खाली उतरून जेवण केले. मात्र, काही वेळातच श्रीनिवासराव यांना जाग आली. मात्र त्यांच्या उशीखाली असलेली बॅग पळवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना घामच फुटला. त्यांनी हा प्रकार चालक व क्लिनर यांना सांगितला. त्यानंतर बस थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आली. या प्रकरणी श्रीनिवासराव यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या ढाब्यावर काही जणांची चौकशीही पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आता अकोला भागात पथके रवाना केली आहेत. हेही वाचा..YES Bank प्रकरण: राणा कपूरच्या मुलींवरही ED ची टांगती तलवार
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Latest news

पुढील बातम्या