मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /NASA मध्ये ट्रेनिंग घेणाऱ्या 17 वर्षांच्या मुलाची कमाल, अवघ्या 3 दिवसांत शोधला नवीन ग्रह!

NASA मध्ये ट्रेनिंग घेणाऱ्या 17 वर्षांच्या मुलाची कमाल, अवघ्या 3 दिवसांत शोधला नवीन ग्रह!

 नासामध्ये काम करताना एखाद्या ग्रहाचा शोध लावायला संशोधकांना बरीच वर्षे लागतात.

नासामध्ये काम करताना एखाद्या ग्रहाचा शोध लावायला संशोधकांना बरीच वर्षे लागतात.

नासामध्ये काम करताना एखाद्या ग्रहाचा शोध लावायला संशोधकांना बरीच वर्षे लागतात.

वॉशिंग्टन, 22 जानेवारी : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासामध्ये (NASA) काम करण्याचे स्वप्न अनेक वैज्ञानिकांचे असते. येथे काम करण्याची संधी मिळाण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. याठिकाणी काम करताना यश मिळालेल्या  प्रत्येक व्यक्तीची चर्चा तर होते. नासामध्ये काम करताना एखाद्या ग्रहाचा शोध लावायला संशोधकांना बरीच वर्षे लागतात. पण याठिकाणी ट्रेनिंगसाठी आलेल्या एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्याने अवघ्या तीन दिवसात हे शक्य करुन दाखवले आहे.

शाळेमध्ये शिकणाऱ्या वुल्फ कुकियर या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याने एक ग्रह शोधून दाखवला आहे.

नासाच्या ग्रीनबेल्टमध्ये असलेल्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये (Goddard Space Flight Center) वुल्फ कुकियर (Wolf Cukier) इंटर्नशिप करण्यासाठी आला होता. याठिकाणी त्याला ट्रांजिटिंग एक्सोप्लॅनेट सर्वे सॅटेलाइटद्वारे (Transiting Exoplanet Survey Satellite) कॅप्चर करण्यात आलेल्या ताऱ्याच्या चमकण्यामधील बदलावर परीक्षण करण्यास सांगितले होते. सांगितल्याप्रमाणे वुल्फ कुकियर या विद्यार्थ्याने आपल्या कामाला सुरुवात केली. पण इंटर्नशिपच्या अवघ्या तिसऱ्या दिवशीच त्याने कमाल करुन दाखवली. कुकियरने एक ग्रह शोधून काढला आहे. त्याला पृथ्वीपासून 13000 प्रकाश वर्षे अंतरावर एक नवीन ग्रह सापडला आहे. वुल्फ कुकियरच्या या कामगिरीचे खूप कौतुक होत आहे.

हे ही वाचा-Sex Scandal! महिला अधिकारीसोबत हॉटेल रुममध्ये सापडला एक प्रसिद्ध क्रिकेटर

कुकियरने याबाबत सांगितले की, 'TOI 1338B नावाच्या सिस्टममध्ये मी एक सिग्नल पाहिला. तेव्हा मला वाटले की हे एक स्थिर ग्रहण (Stellar Eclipse) आहे. पण ते खरं नव्हते. कारण नंतर मला हे माहिती पडले की तो एक ग्रह आहे. मी हे सर्व काही स्वयंसेवकांकाडून गोळा केलेल्या डाटाच्या माध्यमातून पाहू शकत होतो.' दरम्यान, असा दावा करण्यात आलाय की, कुकियरने शोध झालेला  नवीन ग्रह पहिला फिरणारा ग्रह आहे. हा एकाऐवजी दोन ताऱ्यांभोवती फिरतो. नासाचे गोगार्ड म्हणाले, 'हा ग्रह सूर्यापेक्षा 10 टक्के अधिक मोठा आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे हा ग्रह थंड, मंद आणि सूर्यापासून केवळ एक तृतीअंश वस्तुमाना ऐवढा आहे. असे देखील सांगण्यात आले आहे की, 'TOI 1388b स्वयं नेपच्यून आणि शनीच्या आकारापेक्षा जवळपास 6.9 पट मोठा आहे.' नासाद्वारे ट्विट करण्यात आलेल्या फोटोंना 1.2 मिलियनपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर 224 हजारांपेक्षा अधिक युजर्सने या ट्विटला रिट्विट केले आहे.

First published:

Tags: Nasa