गुजरात विधानसभेत तब्बल 154 नरेंद्र मोदी मतदान करणार !

गुजरात विधानसभेत तब्बल 154 नरेंद्र मोदी मतदान करणार !

गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नसले तरी त्यांच्या नावाचे तब्बल 154 लोक मतदान करणार आहे. निवडणूक आयोगान प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत तब्बल 154 मतदार हे नरेंद्र मोदी अशा नावाचे असल्याचं निदर्शनात आलंय.

  • Share this:

गांधीनगर, 01 नोव्हेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नसले तरी त्यांच्या नावाचे तब्बल 154 लोक मतदान करणार आहे. निवडणूक आयोगान प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत तब्बल 154 मतदार हे नरेंद्र मोदी अशा नावाचे असल्याचं निदर्शनात आलंय.

गुजरातमध्ये खरंतर नरेंद्र मोदी यांच्या नावावरच निवडणुका लढवल्या जातात. ते स्वतःच एक ब्रँड आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव अहमदाबाद जिल्ह्यातील मतदार यादीत आहे. याच जिल्ह्यात नरेंद्र मोदी नावाचे सर्वाधिक मतदार म्हणजेच तब्बल ४९ मतदार या मतदारसंघात आहेत. त्याखालोखाल मेहसाना जिल्ह्यातही नरेंद्र मोदी नावाचे २४ मतदार आहेत. तर भारुच जिल्ह्यात १६ आणि सूरतमध्ये १५, पाटन १३, बनासकांठा ११, सबरकांठा, गांधीनगर आणि बडोद्यात अनुक्रमे ७, ६ आणि ६ मतदार नरेंद्र मोदी या नावाने मतदान करणार आहेत.

अर्थात नरेंद्र मोदी हे नाम साधर्म्य असलेले हे सर्वच्या सर्व मतदार हे वेगवेगळ्या विचारधारेचेही असू शकतात. त्यामुळे या 154 मतदारांपैकी नेमके किती नरेंद्र मोदी भाजपला मतदान करणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे. किंबहुना यातल्या एखाद्या नरेंद्र मोदीने राहुल गांधीच्या काँग्रेसला मतदान केल्यास अजिबात आश्चर्य वाटायला नको.

First published: November 1, 2017, 7:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading