मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

तुमची गाडी 15 वर्ष जुनी आहे? जाणून घ्या काय आहे Car Scrap Policy

तुमची गाडी 15 वर्ष जुनी आहे? जाणून घ्या काय आहे Car Scrap Policy

देशातील जुनी वाहने स्क्रॅप  करण्याबाबतचं धोरण अंतिम टप्प्यात आहे. या धोरणानुसार 15 वर्ष जुनी वाहने वापरण्यास बंदी घालण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

देशातील जुनी वाहने स्क्रॅप करण्याबाबतचं धोरण अंतिम टप्प्यात आहे. या धोरणानुसार 15 वर्ष जुनी वाहने वापरण्यास बंदी घालण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

देशातील जुनी वाहने स्क्रॅप करण्याबाबतचं धोरण अंतिम टप्प्यात आहे. या धोरणानुसार 15 वर्ष जुनी वाहने वापरण्यास बंदी घालण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : देशातील जुनी वाहनं स्क्रॅप (Vehicle Scraping Policy) करण्याबाबतचं धोरण अंतिम टप्प्यात आहे. या धोरणानुसार 15 वर्ष जुनी वाहनं वापरण्यास बंदी घालण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता असून, याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांदरम्यान चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. लोकांच्या खाजगी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी ही पॉलिसी लागू होईल? खासगी वाहनांसाठी काही वेगळे नियम असतील? खरंच 15 वर्ष जुनी वाहने डोकेदुखी ठरू शकतील, जाणून घ्या या प्रश्नांबाबत. वास्तविकपणे दिल्लीसारख्या शहरांमध्ये प्रदुषणाचं (Pollution) प्रमाण वाढल्याने राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने 15 वर्षाहून जुन्या वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. भारतातील नियमांनुसार अशी जुनी कार वापरता येणार नाहीत, याबाबत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. परंतु, जुनी वाहनं स्क्रॅप करण्यासाठी कोणतीही एकात्मिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने या वाहनांचा वापर सुरुच आहे. दुसऱ्या राज्यात हस्तांतरीत करण्याचा काही मार्ग आहे? दिल्लीतील रिजनल ट्रान्सपोर्ट कार्यालयांनी आता ही सिस्टीम संपुष्टात आणत जुन्या वाहनांची फिटनेस चाचणी सुरू केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय हा खरंतर सर्व देशासाठी लागू असतो. परंतु, आपल्याला त्याबाबत माहिती नसल्याने आपण जुनी वाहनं वापरत एक प्रकारे नियम, कायद्यांचं उल्लंघन करतो. त्यामुळे या वाहनांचं काय करायचं आणि अशा वाहन वापराने तुमच्याविरोधात काय कारवाई होऊ शकते, हे जाणून घेणं आवश्यक आहे. जर तुमचं वाहन 15 वर्षांपेक्षा जुनं आहे, तर या वाहनाचं नजीकच्या राज्यात जाऊन रि-रजिस्ट्रेशन करणं शक्य आहे. परंतु, ही फार किचकट प्रक्रिया आहे. कारच्या आरसीची मुदत संपण्यापूर्वी हे रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे. अधिक नियम, अटी आणि शर्ती तसंच दोन राज्यांमधील आरटीओ यंत्रणेशी संबंधित ही प्रक्रिया अधिकच डोकेदुखी ठरू शकते.

(वाचा - देशात 50 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनं; पाहा महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर)

कार स्क्रॅपिंग म्हणजे काय? जर तुम्हाला तुमची जुनी कार दुसऱ्या राज्यात नेत रि-रजिस्टर (Re-Register) करायची नसेल, तर तुमच्यापुढे स्क्रॅपिंग हाच एकमेव पर्याय आहे. यामध्ये कारचा प्रत्येक भाग सुटा करुन तो रिसायकल केला जातो. यामुळे जुन्या कारचा अवैध किंवा गुन्हासाठी वापर होण्याची शक्यता संपुष्टात येते. परंतु, कार स्क्रॅप करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. -    अधिकृत डिलरकडेच कार स्क्रॅप करावी. -    स्क्रॅप करतेवेळी चेसिस क्रमांक घ्यावा. -    कार स्क्रॅप करताना डिलरने पर्यावरणीय दृष्टीने सुरक्षितता राखत स्क्रॅपिंग करणं आवश्यक आहे. -    आरटीओला कार स्क्रॅपिंगबाबत माहिती द्यावी, आणि कार रि-रजिस्टर करुन घ्यावी.

(वाचा - तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या गाडीला अपघात झाल्यास नियमानुसार हे असतात अधिकार)

कार स्क्रॅप कशी होते? स्क्रॅप डिलर कारची स्थिती आणि वजनानुसार किंमत ठरवतो. करार झाल्यानंतर डिलर कारचे सर्व भाग सुटे करतो. त्यातील प्लॅस्टिक, रबर आणि लोखंडाची विक्री करतो. जर कारमध्ये सीएनजी किट असेल, तर ते विशिष्ट पध्दतीने नष्ट केलं जातं. या सर्व प्रक्रियेनंतर आपली कार पूर्णपणे नष्ट झाली आहे का नाही याची खात्री कारमालकाने करणं आवश्यक आहे. स्क्रॅप डिलरने कार स्क्रॅप न करता, कारचा वापर गैरकृत्यांसाठी केल्याचं यापूर्वी उघडकीस आलं आहे. त्यामुळे कार ज्या व्यक्तीच्या नावावर त्याला गुन्हे तपासात विनाकारण सहभागी व्हावं लागतं. त्यामुळे कार मालकाने सतर्क राहणं आवश्यक आहे. -    स्क्रॅप डिलरला ओरिजिनल आरसी (RC) देण्याची गरज नाही. -    आरटीओमधील पुढील प्रक्रियेकरिता कार स्क्रॅप करतानाचा फोटो आवश्यक असतो,  तो घेऊन ठेवावा. -    स्क्रॅपनंतर स्पेअरपार्टसच्या माध्यमातून डिलरला मोठा फायदा होऊ शकतो, त्यामुळे व्हॅल्युएशन करताना सावधगिरी बाळगावी. -    कार स्क्रॅप करताना आरटीओच्या नियमांचं पालन करावं. कार स्क्रॅप केल्यानंतर रजिस्ट्रेशनचे काय होते? जेव्हा आरटीओमध्ये कार स्क्रॅपिंगची प्रक्रिया पूर्ण होऊन रि-रजिस्ट्रेशन होतं, तेव्हा तो रजिस्ट्रेशन क्रमांक फ्रि होतो. या क्रमांकाचा उपयोग भविष्यात अन्य वाहनाच्या रजिस्ट्रेशनसाठी केला जातो. कार स्क्रॅप करताना संबंधित विमा कंपनीला माहिती देणंही आवश्यक असतं.

(वाचा - आज मध्यरात्रीपासून FASTag बंधनकारक; जाणून घ्या कसा रिचार्ज कराल)

कार स्क्रॅपिंगच्या फायद्यांबाबत काय चर्चा आहे? प्रदुषणाची पातळी लक्षात घेता सध्या कार स्क्रॅपिंग धोरणासाठी व्यावसायिक वाहनांकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. परंतु, योग्य व्यवस्था आणि धोरण नसल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रातील खाजगी वाहनेही स्क्रॅपिंगचा पर्याय टाळताना दिसून येत आहेत. मात्र या धोरणाकडे वाहनचालकांनी वळावं, यासाठी 15 वर्षांपेक्षा जुनी वाहनं स्क्रॅप करण्यासाठी सरकारने वाहन मालकांना नुकसानभरपाई किंवा अनुदान द्यावं, अशी मागणी भारतीय आटोमोबाईल उत्पादक संघटनेने सरकारकडे केली आहे. अमेरिकेत अशा पध्दतीने धोरण राबवलं जात असल्याचं संघटनेने म्हटलं आहे. कराबाबत चिंता आहे का? अनुदान किंवा नुकसानभरपाईबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु, मंत्रालय जुन्या वाहनांवर कर लागू करु शकते, अशी चर्चा मात्र आहे. जुन्या वाहनांच्या स्क्रॅप धोरणामुळे प्रदुषण 25 टक्क्यांनी कमी होईल, तसेच इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा अंदाज परिवहन मंत्रालयाने व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे स्क्रॅप पॉलिसीत खासगी वाहनांवरील कर वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. जुनी वाहने रस्त्यावर येऊ नयेत यासाठी त्यावर ग्रीन टॅक्स लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे खासगी वाहनमालकांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. 15  वर्ष जुन्या वाहनांवर हा कर रोड टॅक्सच्या तुलनेत 50 टक्के अधिक असू शकतो. वृत्तानुसार, व्यावसायिक वाहनांच्या नुतनीकरणावर समान ग्रीन टॅक्स कमी असेल.
First published:

Tags: Car

पुढील बातम्या