• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

  • Share this:

Image dushkal45645_300x255.jpg16 ऑक्टोबर : दुष्काळग्रस्त भागांतल्या लोकांना अखेर राज्य सरकारने दिलासा दिलाय. राज्यात मंत्रिमंडळाच्या उपसमितीतनं काही गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलीये.

ज्या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी होती त्या गावात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. या गावात कृषीपंपाच्या चालू बिलात 33.5 टक्के कपात घोषित करण्यात आली.

तसंच शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्राला त्वरीत प्रस्ताव पाठवणार असल्याचंही उपसमितीनं सांगितलंय.

दुष्काळग्रस्त भागाला काय मिळणार ? - 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती - या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी - कृषिपंपांच्या चालू वीज बिलामध्ये 33.5 टक्के सवलत - दुष्काळसदृश भागातल्या शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ - कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरू करणार दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर होणं, ही मदत मिळण्यासाठी पहिली पायरी आहे. पण ही पूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असणार ? - राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलीये - हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येईल - मंत्रिंमडळाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव केंद्राकडे जाईल - त्यानंतर केंद्राचं पाहणी पथक राज्यात येईल - पाहणी पथक केद्र सरकारकडे अहवाल सादर करेल - अहलावावरून किती मदत द्यायची हे केंद्र सरकार ठरवेल विभागवार परिस्थिती   कोकण विभाग- एकाही गावात दुष्काळ नाही  नाशिक विभाग -  दुष्काळसदृश गावं - 4, 869 नाशिक - 1577 धुळे - 614 नंदुरबार - 885 जळगाव - 1258 अहमदनगर - 535  पुणे विभाग -दुष्काळसदृश गावं - 782 पुणे - 76 सातारा - 343 सांगली - 363

औरंगाबाद विभाग  दुष्काळसदृश गावं - 8522 औरंगाबाद - 1353 जालना - 969 परभणी- 848  हिंगोली - 707 नांदेड - 1562 बीड - 1403 लातूर - 943 उस्मानाबाद - 737

अमरावती विभाग - 57 अकोला - 55  यवतमाळ - 2 नागपूर - विभाग 478 नागपूर -111 गडचिरोली 367 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: