पिंपरी चिंचवडमधून आली चिंताजनक बातमी, उपचारानंतरही 13 वर्षीय मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवडमधून आली चिंताजनक बातमी, उपचारानंतरही 13 वर्षीय मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत एकूण 123 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 42 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 02 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिंपरी चिंचवडकरांमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.  एका 8 महिन्याच्या बाळासह दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या एका 13 वर्षीय मुलीचे 14 दिवसांच्या उपचारानंतरही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता  वाढली आहे.

पिंपरी शहरात आतापर्यंत 0 ते 14  वयोगटातील दहा पेक्षा अधिक मुलांना कोरोनाची लागण झाल्याचंही स्पष्ट झाल्याने लहान मुलांना covid-19 लागण होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याच दिसत आहे.

हेही वाचा - भयंकर! भुकेल्या लेकरांचं सांत्वन करण्यासाठी आईनं चुलीवर दगड ठेवला उकळत आणि...

ज्या 8 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झालीय तो पिंपळेगुरव परिसरातील आहे तर इतर दोन व्यक्ती सांगवी परिसरातील आहेत. हे तिघेही कुणाच्या संपर्कात आल्याने यांना कोरोनाची लागण झाली याबाबत प्रशासन माहिती घेत करत आहे.

दरम्यान, नागरिकांना आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक त्याच बरोबर विशेष करून लहान मुलांच्या आरोग्याची अधिकाधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केलं जातंय.

हेही वाचा - देशभरातील कोरोनाचे Latest Updates, जाणून घ्या तुमच्या राज्यात काय आहे परिस्थिती?

पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत एकूण 123 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 42 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 5 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरित व्यक्तींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती  मुख्य वैद्यकीय अधिकरी डॉ. पवन साळवे यांनी दिली आहे.

यापुढे कोरोनाची चाचणी पिंपरीतील  NARI मध्ये होणार

दरम्यान, या पुढे पिंपरीतील कोरोना संशयितांचे रिपोर्ट पुण्यात न पाठवता त्यांची तपासणी पिंपरीतील भोसरी परिसरात असलेल्या NARI अर्थात नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्येच केल्या जाणार आहेत. NARI हे  ICMR चीच शाखा आहे. मात्र, इथे आतापर्यंत कोरोनाची चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, पिंपरी शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत संख्या बघता  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी NARI मध्ये covid-19 चाचणी करण्यासंदर्भात मोठा पाठपुरवा केला आणि अखेर या संस्थेत covid-19 चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, पहिल्या दिवशी या संस्थेत पाठविण्यात आलेल्या 8 कोरोना संशशितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 2, 2020, 9:00 AM IST

ताज्या बातम्या