भोपाळमध्ये गणपती विसर्जन करताना बोट उलटली, 13 गणेश भक्तांचा मृत्यू

भोपाळमध्ये गणपती विसर्जन करताना बोट उलटली, 13 गणेश भक्तांचा मृत्यू

मागील 10 दिवस मनोभावे पूजा केलेल्या गणरायाच्या विसर्जानाच्या दिवशी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बोट उलटून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

भोपाळ,13 सप्टेंबर: मागील 10 दिवस मनोभावे पूजा केलेल्या गणरायाच्या विसर्जानाच्या दिवशी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बोट उलटून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. खटलापुरा घाटवर ही घटना पहाटे 3 वाजेदरम्यान घडली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. पोलीस प्रशासन आणि काही राजकीय नेते घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातग्रस्त बोटमध्ये एकूण 20 जण होते. आणखी काही जण बुडाल्याची शक्यती वर्तवण्यात येत आहे.

अशी झाली दुर्घटना..

भोपाळ शहरात या दुर्घटनेमुळे श्रद्धा आणि आस्थेच्या गणेशोत्सवावर विरजण पडले आहे. आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहोचले आहे. सर्व मृत नागरिक पिपलानी 100 क्वार्टर परिसरातील रहिवासी होते. विसर्जन घाटसमोर SDRFचे मुख्यालय आहे. तसेच मध्य प्रदेश होमगार्डचेही मुख्यालय आहे.

मृतांची नावे..

हरीण राणा

करण लुडेरे

रोहित मौर्य

राहुल मौर्य

राहुल

शनि ठाकरे

परवेज

2016 मध्येही झाली होती अशीच दुर्घटना..

भोपाळ शहरात या आधी 2016 मध्येही अशीच घटना घडली होती. खटालपुरा घाटवर बोट उलटून 5 जणांचा मृत्यू झाला होता. बोटमध्ये वाढदिवसाची पार्टी सुरु होती. यादरम्यान बोट उलटली होती. बोटमध्ये 9 जण होते, त्यापैकी 5 जणांचा बुडून मृत्यू झाला होता.

लालाबागच्या राजाच्या विसर्जनाचा LIVE VIDEO; गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 08:58 AM IST

ताज्या बातम्या