पहिल्याच दिवशी भोंगळ कारभार चव्हाट्यावर, जमिनावर बसून विद्यार्थ्यांनी सोडवला पेपर

पहिल्याच दिवशी भोंगळ कारभार चव्हाट्यावर, जमिनावर बसून विद्यार्थ्यांनी सोडवला पेपर

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

  • Share this:

बीड,18 फेब्रुवारी:महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारपासून (18 फेब्रुवारी) सुरू झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. परीक्षार्थीसाठी सेंटरवर भौतिक सुविधांचा अभाव जाणवला. बैठक व्यवस्थेत अनेक त्रुटी दिसून आल्या. काही ठिकाणी लहान मुलांच्या बेंचवर तर शेवटी जमिनावर बसून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी लागली.

विभागाचा हलगर्जीपणा पणा

बीड तालुक्यातील रायमोहा येथे अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली. परीक्षा केंद्रावर इतर भौतिक सुविधांचाही अभाव होता. जमिनीलर फरशी नसल्याने विद्यार्थ्यांना अक्षरश: धुळीत बसून पेपर सोडवावा लागला. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान यंदा राज्यभरात एकूण 12 लाख 5 हजार 27 विविध विषयांचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 18 फेब्रुवारी ते 23 मार्चपर्यंत असणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षेत सहभागी होणार आहेत. त्यापैकी 3 लाख 39 हजार विद्यार्थी हे मुंबईसह उपनगरांमधील आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी 500 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या कालावधीत मुंबईमध्ये रांगेशिवाय विद्यार्थ्यांना तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विद्यार्थ्यांसाठी ज्यादा बस सोडण्याची सुविधा एसटी महामंडळातर्फे करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधून बारावी आणि दहावीच्या परीक्षेला 3 लाखहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी विशेष सुविधा राबवण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल, खाण्याच्या गोष्टी रायटींग पॅड इत्यादी गोष्टी नेण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांकडे कॉपी अथवा तत्सम गोष्टी आढळल्यास कारवाई करणार असल्याच्या पूर्व सूचना महविद्यालयांमध्ये देण्यात आल्या आहेत. यासोबत विद्यार्थ्यांना आपलं हॉल तिकीट आणि कॉलेजचं आयडी कार्ड सोबत ठेवणं बंधनकारक आहे.

'एल्गारचा तपास NIA कडे देणं संशयास्पद....' थोरात यांचं धक्कादायक विधान

यासोबत परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि भरारी पथक नेमण्यात आलं आहे. हे भरारी पथक परीक्षा केंद्रावर त्या कालावधीमध्ये चेकिंग करणार आहेत.

परीक्षा केंद्रात या वस्तू नेण्यास मनाई-

खाण्याचा वस्तू, कॉपी, मोबाइल, मेटलचं सामान, रायटिंग पॅड, चेन इत्यादी गोष्टी परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे. या वस्तू आढळल्यास जप्त केल्या जाणार असल्याची पूर्वसूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

बीडमध्ये शिक्षकच झाला नराधम, शाळेतील मुलींवर केले लैंगिक अत्याचार

First published: February 18, 2020, 4:03 PM IST
Tags: marathwada

ताज्या बातम्या