नाइका, 19 ऑक्टोबर : पेरूच्या नाझ्का वाळवंटात ज्याला रहस्यमय वाळवंट देखील म्हणतात तिथल्या एका डोंगरावर आणखी एका मांजरीचं रेखांकन सापडलं आहे. हे चित्र 121 फूट लांब असून पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की हे सुमारे 2200 वर्षे जुनं आहे. नाझका संस्कृतीचा वारसा मानल्या जाणाऱ्या नाझका रेषा शतकानुशतके पेरूमध्ये संरक्षित आहेत. नाजका लाईन्स पृथ्वीवर बनवलेल्या मोठ्या रेखांकनांचे एक भाग आहेत. अलास्काकडून अर्जेटिनाकडे जाणार्या महामार्गालगतच्या डोंगराच्या बाजूला नवीन रेखाचित्रं दिसतात. या आधी ही मोठमोठ्या मांजरीची रेखाटन बर्याच वेळा आढळली आहेत.
आतापर्यंत 300 हून अधिक वेगवेगळ्या प्रतिमा सापडल्या
आतापर्यंत नाजका लाईन्समध्ये 300 पेक्षा जास्त वेगवेगळ्या आकारांची रेखाचित्रं सापडली आहेत आणि ह्या आकृत्यांमध्ये प्राणी आणि ग्रहांच्या आकारांचा समावेश आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञ जॉनी इस्ला सांगतात की अभ्यागतांना पाहाण्यासाठीच्या जागांची सफाई केली जात असताना मांजरीचं रेखाचित्र सापडलं. ते म्हणाले की, ‘तब्बल 2200 वर्षांपूर्वी, त्या काळच्या माणसांनी आधुनिक तंत्रज्ञानाविना ही चित्रे तयार केल्याचं पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.
मांजरीची रेखाचित्रं धूसर होत आहेत
इसला म्हणाल्या की, रेखांकनापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मोकळा झाला होता, त्यानंतर आम्हाला काही ओळी दिसल्या. आम्हाला अद्याप अनेक नवीन रेखांकनं मिळाली आहेत आणि आशा आहे की आणखी रेखा सापडतील. आम्ही ड्रोनमधून ही सर्व छायाचित्रं काढली आहेत.
हे ही वाचा-शास्त्रज्ञांना सापडल्या 13000 वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा; दडलाय मायलेकाचा इतिहास
पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं की मांजरीचं रेखाचित्र सापडल्यानंतर ते पाहणं फारच अस्पष्ट दिसत होतं. हे चित्र जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. याचे कारण म्हणजे मांजरीचे हे रेखाटन एका उंच डोंगराच्या उतारावर आहे आणि ते नैसर्गिकरित्या झिजत होतं. कित्येक आठवड्यांच्या संवर्धन आणि साफसफाईच्या कामानंतर आता मांजरीसारखी आकृती समोर आली आहे. त्याचं रेखाचित्र 12 ते 15 इंच जाड आहे. इसलाने सांगितले की मांजरीचा आकार परकास काळाच्या शेवटच्या दिवसांमध्ये बनवला गेला होता, जो ईसवीसन पूर्व 500 ते ईसवी सन 200 पर्यंतचा काळ होता.