Home /News /news /

PM Kisan Yojana Latest Updates : पीएम किसानच्या 11व्या हप्त्याचे 'या' शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत!

PM Kisan Yojana Latest Updates : पीएम किसानच्या 11व्या हप्त्याचे 'या' शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत!

पंतप्रधान किसान सन्मान निधी (pm kisan samman nidhi) ही देखील अशीच एक योजना आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 12 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात 6 हजार रुपये पाठवले जातात.

    नवी दिल्ली 15 मे : PM Kisan Yojana Latest Updates : भारतातील बहुतांश शेतकऱ्यांची सध्या आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांचे (farmers lifestyle) जीवनमान उंचावण्यासाठी वेळोवेळी अनेक योजना सुरू सरकारकडून आखल्या जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी (pm kisan samman nidhi) ही देखील अशीच एक योजना आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 12 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात 6 हजार रुपये पाठवले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये प्रमाणे 3 हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जाते. पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता 1 जानेवारी रोजी देण्यात आला आहे. शेतकरी आता 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर मे अखेरच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही तारखेला जमा केली जाऊ शकते. हे ही वाचा : Monsoon Updates: मान्सूनची वेळेआधी हजेरी, 48 तासांत बंगालच्या उपसागरात होणार दाखल या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत! जे सरकारी नोकरी करतात त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. घटनात्मक पदांवर असलेले असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात किंवा PSU किंवा कोणत्याही सरकारी संस्थेत काम करणारी व्यक्ती शेती करत असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसानचे पैसे जमा झाले की नाहीत असे तपासा सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. यानंतर 'Farmers Corner' या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Beneficiary Status क्लिक करा. आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका. त्यानंतर 'Get Report' पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल. या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता. 11व्या हप्त्या मिळवण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतील शेतकऱ्यांच्या खात्यात 11 वा हप्ता वर्ग करण्यापूर्वी सरकारने अनेक नियम केले आहेत. यावेळी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाणार नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे ठेवली. या तारखेपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही ते 11 व्या हप्त्यापासून वंचित राहतील. ऑनलाइन व्यतिरिक्त, शेतकरी ऑफलाइन देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी त्यांना जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ई-केवायसी ऑनलाइन पद्धतीने करण्याची प्रक्रिया सर्व प्रथम पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. 'Farmers corner' अंतर्गत E- kyc टॅबवर क्लिक करा. तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, तिथे आधार क्रमांकाची माहिती देऊन सर्च टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. 'Submit OTP' वर क्लिक करा आणि OTP टाकून सबमिट करा.
    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Farmer, PM Kisan

    पुढील बातम्या