S M L

जबलपूरच्या अपघातात गोंदियातले 11 जण ठार

गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या 11 तेंदूपत्ता कामगारांचा मध्यप्रदेशातल्या जबलपूरमध्ये अपघाती मृत्यू झालाय.

Sachin Salve | Updated On: May 11, 2017 08:23 PM IST

जबलपूरच्या अपघातात गोंदियातले 11 जण ठार

11 मे : गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या 11 तेंदूपत्ता कामगारांचा मध्यप्रदेशातल्या जबलपूरमध्ये अपघाती मृत्यू झालाय. तर 15 जण जखमी झालेत. यातल्या चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

पळसगाव पंचक्रोशीतले हे कामगार मध्य प्रदेशात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. जबलपूर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ते वनविभागाच्या गाडीनं जात होते. यावेळी नरसिंह गोटेगाव रस्त्यावर वाहनाचं नियंत्रण सुटून वाहन रस्त्याशेजारी आदळलं. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झालाय. तर 15 जण जखमी झालेत. हे सर्व मजूर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील विविध गावातील असल्यामुळे गावात एकच  शोककळा पसरली आहे.

मृतकांचे  नाव


1- बुधराम  लक्खू (40)

2- चुन्नी लाल  दायाराम चौधरी (35)

3- लच्छू  कुंवरलाल चौधरी (30)

Loading...

4- रामनाथ  गनपत सरोते (40)

5- तुलाराम  हरिशचंद्र भोयर  (35)

6- प्रदीप  माऊराव हल्वी (19)

7- छगन  नीलकंठ कामळे  (30)

8- शंकर  रामकृष्‍ण मरस्कोले  (35)

9- गनेंद्र  तेजराम (35)

10- टुमेश्वर  दयाराम भोयर  (32)

11- संतू  दामा शिंदे (53)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 08:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close