पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 10 दिवस कडक लॉकडाऊन; 5 दिवसांनंतर या सेवा होतील सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 10 दिवस कडक लॉकडाऊन; 5 दिवसांनंतर या सेवा होतील सुरू

लॉकडाऊनमध्ये नागरिक कसं सहकार्य करतात, त्यावर कोरोना संसर्गाची साखळी तुटणार की नाही, हे अवलंबून असणार आहे.

  • Share this:

पुणे, 13 जुलै : कोरोना व्हायरसचा झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव लक्षात पुणे (Pune Pimpari Chinchwad) आणि पिंपरी चिंचवड शहरात कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिक कसं सहकार्य करतात, त्यावर कोरोना संसर्गाची साखळी तुटणार की नाही, हे अवलंबून असणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जारी केलेले नियम, अटी पाळणं गरजेचं आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. पहिले पाच दिवस फक्त दूध घरपोचसेवा आणि मेडिकल्स वगळता सर्व सेवा बंद राहतील. 19 जुलैपासून भाजीपाला आणि दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू राहणार आहेत. पुणे मनपाचे नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

पुणे पिंपरी चिंचवडमध्ये काय बंद राहणार?

- किरणा दुकाने, भाजी विक्री, मटन, अंडी, चिकन, मासे (14 ते 18 जुलै)

- ऑनलाईन खाद्यपदार्थ, वस्तूंची डिलिव्हरी

- मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, बाग, क्रीडांगणे आदी

- हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल

- सलून, ब्यूटी पार्लर

- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था

- दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद (फक्त पासधारकांनाच परवानगी)

- बांधकामे (ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासीच व्यवस्था आहे, तेथे काम सुरू ठेवता येणार)

- मंगल कार्यालये, लग्न समारंभ आदी

-सर्व खासगी कार्यालये

काय सुरू राहणार ?

- पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार (फक्त पासधारकांनाच इंधन, गॅस मिळणार)

- दूध आणि वृत्तपत्रांचे घरपोच वितरण

- सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, ऑनलाईन औषध सेवा

- मेडिकल दुकाने, औषधांची घरपोच डिलिव्हरी

- गॅस वितरण

- बॅंका (ग्राहकांना बँकेत जाता येणार नाही), एटीएम

- माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचाऱ्यांसह

पुण्यात कोणाला घराबाहेर पडता येणार?

- डॉक्‍टर, नर्स, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाने विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा, शहरातून जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाणारे कामगार (पोलिस पाससह), जीवनावश्‍यक वस्तू, पार्सल, डबे पुरविणारे (पोलीस पाससह).

Published by: Meenal Gangurde
First published: July 13, 2020, 10:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading