बापरे! 1 तोळं सोनं 1 लाखांपार; या देशात सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड

बापरे! 1 तोळं सोनं 1 लाखांपार; या देशात सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड

आधीच जगभरात कोरोनाचा कहर असताना सोन्याच्या किंमतीची इतका मोठा उच्चांक गाठला आहे

  • Share this:

इस्लामाबाद, 2 जुलै :  महागाईमुळे पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत आता सर्व काळातील उच्चांकी पातळीवर गेल्या आहेत. पाकिस्तान वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, गुरुवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतींनी मोठी उच्चांकी गाठली. त्यानुसार1,05, 200 रुपये (पाकिस्तानी रुपया) प्रती तोळा झाले आहे. यापूर्वी 24 जून रोजी सोन्याच्या किंमती प्रति तोळा 1,05,100 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या.

सोने का होत आहे महाग - कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणार्‍या किंमतींचा परिणाम स्थानिक बाजारात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे रत्नं व दागिन्यांच्या क्षेत्रात मोठे नुकसान होत आहे. तसेच त्यांच्या जुन्या ऑर्डरची देयता आंतरराष्ट्रीय स्तरावर अडकली आहे. ऑल पाकिस्तान जेम्स ज्वेलर्स ट्रेडर्स एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुहम्मद अख्तर खान टेसोरी यांनी वाणिज्य मंत्रालयाला सांगितले की देशातून निर्यात केलेल्या दागिन्यांसाठी देय रक्कम (पेमेंट) 120 दिवसांच्या आत मिळावी.

हे वाचा-VIDEO : कोरोनामुळे झाला मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह

एएसएसजेएचे अध्यक्ष हाजी हारून रशीद चंद म्हणतात की, आता पाकिस्तानात सोन्याची खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी अवघड झाली आहे. कोरोनाच्या काळात  सर्वसामान्यांना रोजचा खर्च उचलणे अवघड होत असताना सोन्याच्या किमती दुपटीने वाढत आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत सततच्या अनिश्चिततेमुळे परदेशातूनही गुंतवणूक करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे भारतात सोन्याची किंमत प्रति तोळा 48,825 रुपये झाली आहे. यामध्ये 12.5 टक्के आयात कर आणि 3 टक्के जीएसटीचा देखील समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किंमती आज आठ वर्षांच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचल्या आहेत.

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: July 2, 2020, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading