उल्हासनगरमध्ये 1 हजारांच्या खरेदीवर 1 लिटर पेट्रोल फ्री; ग्राहकांची उडाली झुंबड

उल्हासनगरमध्ये 1 हजारांच्या खरेदीवर 1 लिटर पेट्रोल फ्री; ग्राहकांची उडाली झुंबड

या आधी कांद्याचे भाव गगनाला भिडले असतांना त्याने एक हजारांच्या खरेदीवर 5 किलो कांदे मोफत दिले होते.

  • Share this:

उल्हासनगर, 9 मार्च : लॉकडाऊनमध्ये अनेकांनी व्यवसाय करण्यासाठी नवनव्या युक्त्या शोधून काढल्या आहेत. अशीच एक भन्नाट कल्पना उल्हासनगरमधील एका व्यापाऱ्याने शोधून काढली आहे. हा व्यापारी आपल्या दुकानात एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री देत आहे. यासाठी तो आपल्या दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकाला कुपन देतो आणि ते कुपन पेट्रोल पंपावर दाखवून ग्राहकाला एक लिटर पेट्रोल गाडीत टाकून दिलं जातं.

यासाठी त्याने उल्हासनगरमधील एक पेट्रोल पंपाच्या मालकासोबत टायप देखील केला आहे. दरम्यान त्याची ही आयडिया यशस्वी ठरली असून ग्राहकही त्याांना चांगला प्रतिसाद देत आहेत. दिवसागणिक पेट्रोलचे वाढणारे दर सर्वसामान्यांची काळजी वाढवत आहेत. या भाव वाढीमुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल दर वाढी बरोबरच गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने गृहिणींना याचा मोठा फटका बसतो आहे. त्यामुळे नागरिक ज्या ठिकाणी पैशांची बचत होईल तिथे खरेदीला पसंती देत आहेत.  उल्हासनगरच्या शिरू चौकातील शीतल हँडलूम या दुकानाच्या मालकाने ही नवी ऑफर मार्केटमध्ये आणली आहे. या आधी कांद्याचे भाव गगनाला भिडले असतांना त्याने एक हजारांच्या खरेदीवर 5 किलो कांदे मोफत दिले होते.

हे ही वाचा-प्रेमप्रकरणात तरुणानं मागितली मदत, पुणे पोलिस आयुक्तांनी दिलं भन्नाट उत्तर

या दुकानात चादरी, मखमलचे ब्लॅंकेट आणि पडदे विकले जातात. सध्याच्या परिस्थितीत बाजार थंड असल्यानं या दुकानाचे मालक ललित शिवकानी यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही आगळीवेगळी ऑफर आणली आहे. यासाठी 17 सेक्शनच्या एचपी पेट्रोलपंपासोबत दुकानमालकाने टायप केलंय. या दुकानातून तुम्ही एक हजार रुपयांच्या चादरी किंवा पडदे घेतले तर तुम्हाला एक लिटर पेट्रोलचं एक कुपन दिलं जातं. हे कुपन तुम्ही पेट्रोलपंपावर देऊन एक लिटर पेट्रोल मोफत मिळवू शकता. याबाबतचा फलक मालक ललित शिवकानी यांनी दुकानाच्या बाहेरसुद्धा लावला असून त्यांच्या या ऑफरची सध्या उल्हासनगरात चर्चा आहे.

गेल्या तीन दिवसात 28 ग्राहकांनी 1 हजारापेक्षा जास्त खरेदी करत हे कुपन मिळवलंय. त्यामुळे खरेदी आणि पेट्रोल असा दुहेरी फायदा ग्राहक घेतायत. ही ऑफर देत असतांना वस्तूंच्या किंमतीमध्ये कोणतीच वाढ केलेली नाही. त्यामुळे ग्राहकांचा यात फायदा होत असून आमच्या मालाची थंडावलेली खरेदी-विक्री वाढल्याने आम्ही समाधानी आहोत असे दुकान मालक ललित शिवकानी यांनी सांगितले. तर ही चांगली ऑफर आहे यामुळे खरेदीसाठी आलो आहोत अशी प्रतिक्रिया ग्राहक देत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: March 9, 2021, 6:17 PM IST

ताज्या बातम्या