• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • शेतकऱ्यांना 25 तर आडतांना 50 हजार रुपये काढण्याची मुभा

शेतकऱ्यांना 25 तर आडतांना 50 हजार रुपये काढण्याची मुभा

  • Share this:
bank_q 17 नोव्हेंबर : शेतकरी तसंच आडत व्यापा-यांना मोठा दिलासा देत सरकारनं आज मोठ्या घोषणा केल्या. शेतकरी आता आठवड्यातून 25 हजार रूपये काढू शकतात तर आडत व्यापा-यांना 50 हजार रूपये काढण्याची मुभा देण्यात आलीय. अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्यांच्या घरी लग्न असेल ते अडीच लाख रूपये अकाऊंटमधून काढू शकतात अशी माहिती दिली. क्रॉप लोन भरण्यासाठी शेतक-यांना 15 दिवस वाढवून देण्यात आलेत. सरकारनं नोटबंदी केलीय तेव्हापासून देशभरात शेतक-यांना सर्वाधिक फटका बसतोय. विरोधकांनी काल हा संसदेत मुद्दा उपस्थित केला. तुळशीचं लग्न पार पडलंय आणि अनेक ठिकाणी लग्न घरं सजतायत. पण पैशांची कमतरता भासत असल्यामुळे सरकारनं त्यांच्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा सर्वाधिक ठेवलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: