• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला केंद्र सरकारचा नकार

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला केंद्र सरकारचा नकार

  • Share this:
कर्जमाफीच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना संभ्रमात टाकलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला केंद्र सरकारनं नकार दिला आहे. तर राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 620-Fadnavis शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्यात रान पेटलं असताना मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारी करून केंद्र सकारात्मक कर्जमाफीबाबत असल्याचं सांगितलं. पण मुख्यमंत्र्यांनी हा दावा कोणत्या आधारावर केला, हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला केंद्र सरकारनं साफ नकार दिला आहे. एवढचं नाही तर काय ते राज्यांनीच पाहून घ्यावं, असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा चेंडू राज्यांच्या कोर्टात टोलावला आहे. 'कर्जमाफीचा मुद्दा अनेक राज्यांत उपस्थित झालाय. राज्यांची जर क्षमता असेल आणि त्यांना कर्जमाफी द्यायचीच असेल तर ते स्वत: पर्याय शोधू शकतात. केंद्र सरकार एकाला मदत आणि दुसऱ्याला नकार देऊ शकत नाही.', असं जेटलींनी म्हटलं आहे. जेटलींनी राज्य सरकारांवर हा प्रश्न सोपवला असला तरी ते शक्य दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच असेल तर जवळपास 30 हजार कोटींची तरतूद करावी लागेल. पण राज्याच्या तिजोरीतला खडखडाट पाहता इतका पैसा आणायचा कुठून हा सरकारसमोर प्रश्न आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी नाकारली आहे. आता हा मुद्दा निकाली लावण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकार गोंधळ वाढवण्याचं काम करतायत. ते पाहता मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत की जेटलींनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली, हा प्रश्न उपस्थित होतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: