• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • विराटची अशी बॅटिंग, ऑटोग्राफ करुन दिल्या चाहत्याला 500च्या नोटा

विराटची अशी बॅटिंग, ऑटोग्राफ करुन दिल्या चाहत्याला 500च्या नोटा

  • Share this:

virat_kohali3416 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटबंदीमुळे सर्वांची गैरसोय झालीये. याचाच फटका भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीही बसला. विराटने 500 ची नोटेवर ऑटोग्राफ देऊन ती चाहत्यांना दिली. तसंच त्याने नोटबंदीचं स्वागतही केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलाय.

दुसरी टेस्ट मॅच खेळण्यासाठी टीम इंडिया आणि इंग्लड विशाखापट्टणम मध्ये दाखल झाली. मॅचच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने त्याला विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी पत्रकारांनी नोटबंदीबाबत विराटला विचारल असता त्याने पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या र्निणयाला पाठिंबा दिला आहे.

टीम इंडियाच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने पंतप्रधान मोदींच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदींच्या निर्णयाचे समर्थन केलं आहे. त्याच सोबत तो असं म्हणाला की, भारतामध्ये हे पहिल्यांदा झाले आहे. मी पंतप्रधानांच्या या निर्णयाला सलाम करतो. इंडिया आणि इंग्लडमधील दुसरी टेस्ट सिरीज उद्या खेळण्यात येईल.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना विराटने नोटबंदीचा आपल्याला कसा फटका बसला याचा किस्सा सांगितला. "राजकोटमध्ये हॉटेलचे बिल भरण्यासाठी जेव्हा मी पैसे काढले तेव्हा माझ्या लक्षात आले की, आता या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्या आहेत. त्या नंतर मी त्या नोटांवर ऑटोग्राफ करुन लोकांना देत आहे ज्या आता काही कामाच्या नाही राहिल्या" असं विराटने गमंतीने सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: