• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • राष्ट्रवादीला महायुतीत जागा नाही -मुंडे

राष्ट्रवादीला महायुतीत जागा नाही -मुंडे

  • Share this:

munde on ncp 34629 जानेवारी : 2002 दंगलीबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याचं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वागत केलंय. पण कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, उद्या जर राष्ट्रवादीने महायुतीत येण्याचं जरी ठरवलं तरी आम्ही येणार्‍या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढणार नाही असं मुंडे यांनी स्पष्ट केलंय. आमची आता पाच पक्षांची महायुती आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वचन दिलंय उद्या काहीही झालं तरी आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही असंही मुंडे म्हणाले. आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी त्यांनी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी मनसे, शिवसेनेबद्दलही आपली मतं व्यक्त केली. तसंच सत्तेत आल्यावर टोल आणि एलबीटी रद्द करण्याची घोषणाही केली.

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंद' उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आपल्या आनंदच आहे. पण गेल्या 15 वर्षांपासून लोक या सरकारला वैतागली आहे. उद्या कोण मुख्यमंत्री व्हावा याबाबत लोकांना काहीही घेणं देणं नाही. पण हे सरकार गेलं पाहिजे यासाठी आमचा लढा सुरू आहे. बाळासाहेब असतांना युती सरकारमध्ये मी उपमुख्यमंत्री झालो होतो. जरी उद्या सेनेचा मुख्यमंत्री झाला तरी सेनेच्या मंत्रिमंडळात मी सहभागी व्हायचं की, नाही हे पक्ष ठरवेल. पक्षाने जर मला आमदार व्हा म्हटले तरी मी होईल पण आम्हाला आता परिवर्तन घडवायचं आहे. या सरकारला सत्तेवरुन खाली खेचायचं आहे असंही मुंडे म्हणाले. राष्ट्रवादीच्या बालकिल्ल्यावर हल्ला करणार आम्ही निवडणुकीसाठी सज्ज झालो आहोत. पण कोल्हापूर ते सोलापूर या पट्‌ट्यात आम्ही कमी पडतो. त्यामुळे आम्ही यशाच्या जवळ जाऊनही अपयश पदरी पडतं. म्हणूनच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर हल्लाबोल करण्याची रणनीती आम्ही आखली आहे. खरं पाहता राष्ट्रवादीची एवढी ताकद नाही पण त्यांच्याच बालेकिल्ल्यात मतांची विभागणी होते. ही मतांची विभागणी टाळण्यासाठी आरपीआयला सोबत घेतलं आहे. मुख्यत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेतलं आहे. आणि मागच्या वेळी माढा येथून उभे राहिलेले उमेदवार सोबत घेतले आहे. या सगळ्यांची शक्ती मिळून आम्ही लढणार आहोत उद्या जर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा पराभव झाला तर नवल वाटू नये. महाराष्ट्रात सत्ता मिळवायची आहेच पण दिल्लीतही झेंडा फडकावयाचा आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला पराभव करायचाय असा विश्वासही मुंडेंनी व्यक्त केला. व्यक्ती नाही तर प्रवृत्तीविरोधात लढा आम्ही राष्ट्रवादीविरोधात मैदानात उतरलो असलो तरी माझा कोणत्याही एका व्यक्तीवर राग नाही. माझा शरद पवार असो अथवा अजित पवार यांच्यावर राग नाही. माझा लढा हा प्रवृत्तीविरोधात आहे. कारण ज्या प्रकारची भाषा, ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं आहे. ते लोकांना नकोसे झाले आहे. सोलापूरमध्ये एक माणूस उपोषणाला बसला होता. त्यांच्याबद्दल अजित पवारांनी काय भाषा वापरली होती ही अख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्या मस्तीच्या विरोधात माझा लढा आहे. मागेही मी शरद पवार यांच्याविरोधात लढलो होतो त्यावेळी पवारांची मोठी ताकद होती. पण त्यावेळी सरकारचा खरा चेहरा लोकांपुढे आला म्हणून परिवर्तन घडलं. आताही लोक यांच्या मस्तीला वैतागली आहे. आम्हीच सत्ते राहणार, आमच्या वाटेत कुणी येऊ शकत नाही, आमचा कधी पराभव होऊ शकत नाही. अशी मग्रुरीची भाषा लोकशाहीत टिकणारी नाही. एकाच पक्षाच्या हातात सत्ता असणे हे हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. त्यामुळे यांची मस्ती उतरवायची आहे असंही मुंडे म्हणाले. एकत्र येण्याचा निर्णय राज-उद्धव यांच्यावरच मनसेला सोबत घेण्याचा पहिला विचार मीच मांडला होता. मनसेनं महायुतीत यावं असं महायुतीच्या इतर पक्षच काय तर मनसेच्या कार्यकर्त्यांना सुधा वाटतं. पण शेवटी कार्यकर्त्यांना जे वाटतं ते घडतं असं होत नाही. एकाच मुद्यावर लढणार्‍या दोन पक्षांनी एकत्र यावं ही त्यामागची भावना होती, दोन भावांनी एकत्र यावं ही भावना होती आणि लोकांनी यासाठी दबाव टाकावा असे तिन्ही प्रयत्न आम्ही केले पण त्याला यश आलं. पण 'नथिंग इज इम्पासिब्ल' आतापर्यंत काही यश आलं नाही. यापुढे मी मनसेला एकत्र आण्याचे प्रयत्न करणार नाही असं जाहीर केलंय. जर उद्धव आणि राज यांच्या मनात  एकत्र येण्याचा विचार आला तर नक्की मध्यस्थी करेन पण उद्या जर निवडणुकीच्या निकाल नंतर कुणाची गरज पडली तर ती परिस्थिती वेगळी असेल पण या दोन्ही भावांनी एकत्र येणं हे दोघेचं ठरवू शकता तिसरा माणूस हे काम करु शकणार नाही असंही मुंडे यांनी सांगितलं.
First published: