• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • राज ठाकरेंनी उद्धवंना 5 वेळा फोन केले, नांदगावकरांचा खुलासा

राज ठाकरेंनी उद्धवंना 5 वेळा फोन केले, नांदगावकरांचा खुलासा

  • Share this:

balanadgaonkar_on_sena330 जानेवारी : आम्ही लहान भाऊ म्हणून राहु, तुम्ही मोठे भाऊ म्हणून निर्णय घ्या पण अजूनही वेळ गेली नाही असं साकडंच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घातलंय. एवढंच नाहीतर राज ठाकरे यांनी पाच वेळा फोन केला पण उद्धव ठाकरे यांनी उचलला नाही असा खुलासाही नांदगावकर यांनी केला.

शिवसेना आणि मनसेची युती व्हावी यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मातोश्री गाठली खरी पण माझ्याकडे कुणाचाही प्रस्ताव आला नाही. सेना स्वबळावरच लढणार असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यामुळे राज ठाकरे यांनी टाळीसाठी पुढे केलेला हात मागे घ्यावा लागला. पण, बाळा नांदगावकर यांनी अजूनही आशावादी आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली अस्वस्था बोलून दाखवली.

शिवसेना आणि मनसे युती व्हावी अशी राज ठाकरे यांचीच इच्छा आहे. त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करायची होती. त्यासाठी त्यांनी पाच वेळा उद्धवंना फोन केले. तीन फोन तर माझ्यासमोरच केले पण त्यांनी फोन उचलला नाही. युती जर झाली तर शिवसेनाच फायदा होईल असा खुलासाच नांदगावकर यांनी केला.

मातोश्रीवर जाऊन मी युतीचा प्रस्ताव दिला. सुभाष देसाई यांच्याशी बोलणं झालं.  आम्ही फक्त आमच्या आहे. त्या जागा मागितल्या.  मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं गरजेचं असल्याचंही त्यांना सांगितलं असंही नांदगावकर म्हणाले.

मी त्यादिवशीची भाजपचा मेळावा पाहिला मला त्रास झाला. म्हणून मी मातोश्रीवर गेलो होतो. मुंबईसाठी मराठी माणसासाठी एकत्र यावं यासाठी मी प्रयत्न केला. आम्ही लहान भाऊ म्हणून राहू. तुम्ही मोठे भाऊ म्हणून निर्णय घ्या असंही नांदगावकर म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: