• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मोदी नक्राश्रू ढाळतात -सोनिया गांधी

मोदी नक्राश्रू ढाळतात -सोनिया गांधी

  • Share this:

Image img_221882_soniyagandih5645_240x180.jpg31 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगत चाललाय. आज (सोमवारी) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्षा सोनिया गांधी आमने-सामने आले.

अरुणाचलमध्ये झालेल्या सभेत निदो तानियमच्या हत्येच्या मुद्द्यावरून मोदींनी सोनियांना लक्ष्य केलं. तसंच इटलीच्या नौसैनिकांच्या मुद्द्यावरूनसुद्धा त्यांनी केंद्राच्या कारभारावर टीका केली. 'मॅडम' केरळमध्ये दोन गरीब मच्छिमारांची इटलीच्या नौसैनिकांनी हत्या केली. पण तरीही या हत्यार्‍या नौसैनिकांना देशाबाहेर जाण्यास मदत केली ? असा खडासवाल मोदींनी उपस्थिती केला.

तसंच काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीकाही मोदींनी केली. मोदींच्या टीकेला सोनिया गांधींनी हरियाणामध्ये झालेल्या सभेत आपल्या शैलीत उत्तर दिलं. भाजपचं लक्ष फक्त सत्तेकडे आणि पंतप्रधानपदाकडे लागलं आहे त्यांना जनतेशी काहीही घेणं देणं नाही अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. तसंच सामान्यांच्या समस्या सोडवण्यापेक्षा भाजपचे नेते केवळ नक्राश्रू ढाळत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

First published: