• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मॅगीनंतर आता हल्दीराम !, उत्पादनांची होणार तपासणी

मॅगीनंतर आता हल्दीराम !, उत्पादनांची होणार तपासणी

  • Share this:
haldirams09 जुलै : चटकदार मॅगीवर बंदी घातल्यानंतर आता खवय्यांच्या आवडीच्या 'हल्दीराम'चा नंबर लागतो की काय अशी शक्यता निर्माण झालीये. अमेरिकेत हल्दीरामवर बंदी घालण्यात आलीये. त्यापार्श्वभूमीवर भारतातही हल्दीरामच्या उत्पादनाची चाचणी घेतली जाणार आहे. तसा अहवाल देण्याचे आदेशही अन्नसुरक्षा विभागाला देण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पॅकेटबंद स्नॅक्स म्हणून हल्दीराम कंपनीच्या उत्पादनाचा बाजारात दबदबा आहे. हल्दीरामच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थामुळे खवय्यांच्या पसंतीला आलाय. हल्दीरामचे उत्पादन सातामुद्रापार अमेरिकेतही पोहचले. मात्र, आता तिथे हल्दीरामवर संक्रांत आलीये. अमेरिकेत हल्दीरामच्या खाद्यपदार्थात कीटकनाशकाचं प्रमाण अधिक आढळल्याने तसंच विषाणू आढळून आल्याने हल्दीरामच्या उत्पादनावर बंदी घातलीये. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अमेरिकेप्रमाणे राज्यातही हल्दीराम उत्पादनात कीटकनाशक आहे का याची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षा कायद्यातल्या तरतूदींप्रमाणे खाद्य तेलाची प्रत्येकवेळी नव्या पॅकमध्ये करणं बंधनकारक केलंय. कारण तेलाचं जुन्या डब्यात रिपॅकिंग होत असल्याची माहिती मिळाल्याने जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देशही राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी अन्नसुरक्षा विभागाच्या आयुक्तांना दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: