• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मुंबईमध्ये राजभवनाच्या खाली सापडलं 13 खोल्यांचं भुयार

मुंबईमध्ये राजभवनाच्या खाली सापडलं 13 खोल्यांचं भुयार

  • Share this:

æÆü»Ö»ÖÖêÖêË

16 ऑगस्ट :  गेल्या अनेक दशके बंद असलेले 150 मीटर लांबीचे ब्रिटिश कालीन भुयाराचा शोध लागला आहे. मलबार हील इथल्या राजभवनात हे भुयार सापडलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भुयाराची पाहाणी केली आहे. तसंच या भुयाराला राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी पत्नी विनोधा यांच्यासह भेट दिली. तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी राहणार्‍यांनी राज्यपालांना या भुयारा विषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी हे भुयार उघडण्याचे आदेश दिले.

12 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी या बंकराच्या पूर्व दिशेला असलेल्या प्रवेशद्वारासमोर बांधलेली भिंत तोडली. त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आत भुयार सापडले. यात एकूण वेगवेगळ्या आकाराच्या 13 रूम सापडल्या. हे बंकर 20 फूट उंच आहेत. त्याचे आणखी एक द्वार पश्चिमेला आहे. खूप मोठा पॅसेज असून छोट्या छोट्या रुम्सही सापडल्या आहेत. हे बंकर सुमारे 5000 स्केअर फूटांचे असून याची लांबी 150 मीटर आणि गेट 20 फूट उंचीचा आहे. या भुयाराचा वापर दारूगोळा, काडतुसे, इतर युद्ध साहित्य ठेवण्यासाठी होत असे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: