• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मलिक म्हणाले, उद्धव ठाकरे फेकू !

मलिक म्हणाले, उद्धव ठाकरे फेकू !

  • Share this:

235 malik on udhav23 जानेवारी : जादूटोणाविरोधी कायदा झाल्यामुळे आता गंडे, धागे दोरे बांधून काहीही होणार नाही तसंच उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेल्यापासून फेकुगिरी करायला लागले आहे देशाचा पंतप्रधान 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरुन भाषण करत नाही तर 15 ऑगस्टला करतात असा सनसणीत टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेला लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत शिवसैनिकांना शिवबंधन आणि प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी शिवसैनिकांना संबोधित असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली. उद्धव यांच्या टीकेचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला. उद्धव यांच्या भाषणात आत्मविश्वास नव्हता. कारण बाळासाहेबांनी आपल्या अखेरच्या भाषणात उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या, त्यांच्याशी एकनिष्ठ राहा असं आवाहन केलं होतं.

पण आज कार्यक्रमात बाळासाहेबांची ध्वनीफित ऐकवून शिवसैनिकांना शपथ दिली त्यानंतर उद्धव यांनी प्रतिज्ञा दिली. आपण जर पहिल्यांदा शपथ दिली असती तर शिवसैनिक एकनिष्ठ राहिले असते की नाही हा मोठा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी शिवसैनिकांवर अविश्वास दाखवलाय आणि शिवबंधनाच्या नावाखाली शपथ दिलीय. त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास नाहीय, अनेक सेनेचे खासदार सेना सोडण्याच्या तयारीत आहे म्हणून शिवबंधनाच्या नावाखाली शिवसैनिकांना अडकवण्याचा प्रयत्न केलाय असा टोला मलिक यांनी लगावला. तसंच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली, ठीक आहे पण त्यांनी अर्थमंत्री म्हणून दहा वर्ष जे काम केलं आहे त्याबद्दल दूमत नाही. पण आज भाषण करतांना उद्धव यांचा नरेंद्र मोदी झाला. मोदींसोबत गेल्यामुळे त्यांनीही फेकुगिरी सुरू केलीय. येत्या 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी काँग्रेसचा शेवटचा पंतप्रधान लालकिल्यावरुन भाषण करणार आहे. त्यांच्यानंतर कधीच काँग्रेसचा पंतप्रधान लालकिल्यावरुन बोलणार नाही असं उद्धव म्हणताय पण उद्धव ठाकरे इतके वर्ष राजकारणात आहे. 26 जानेवारीला पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन भाषण करत नाही तर 15 ऑगस्टला भाषण करत असतात हे त्यांना माहित नाही का असा खोचक टोलाही मलिक यांनी लगावला.

First published: