• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मनसेचा मेळावा पालिका निवडणुकाच्या प्रचाराची नांदी ?

मनसेचा मेळावा पालिका निवडणुकाच्या प्रचाराची नांदी ?

  • Share this:

raj_thackeryमुंबई - 08 एप्रिल : मनसेची आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा आहे. पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, आणि हा मेळावा मनसेच्या प्रचाराची नांदी ठरू शकते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यावर आता मुंबई महापालिकेची निवडणूक मनसेसाठी करो या मरोसारखी आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे राज आज कोणते मुद्दे मांडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

पहिला गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होणार असून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तब्बल सात वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्काहून भाषण करणार आहेत. या संधीची मनसेकडून गेले कित्येक वर्ष वाट पाहिली जात होती. आणि आता मुंबई महापालिका निवडणुकाजवळ असताना मनसेला ही सूवर्ण संधी मिळाली आहे.

या संधीवर पाणी फेरण्याचा अनेकांनी प्रयत्न केला असला तरी अखेर आज शिवाजी पार्कावर मनसेची ललकारी गुंजणार आहे. या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ही सभा मनसेच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी निर्णायक मानली जात आहे.

मनसेसाठी ही सभा अतिशय महत्वाची असल्यानं आज मनसेच्या नेत्यांनी कार्यक्रमाच्या तयारीची पाहाणी केली. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी ही पाहाणी केली आणि गुडीपाडव्याची सभा गाजणार असा विश्वास व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: