• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मध्य रेल्वेवर आज शेवटची लोकल दीड वाजता

मध्य रेल्वेवर आज शेवटची लोकल दीड वाजता

  • Share this:
mumbai-locals31 डिसेंबर : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकलही सज्ज झाली आहे. आज मध्यरात्रीनंतर विशेष लोकल फेऱ्यांची सुविधा दिली आहे. यात सीएसटी ते कल्याण आणि पनवेल मार्गावर एकूण 4 फेऱ्या चालविल्या जाणार आहे. सीएसटीहुन शेवटची लोकल 1.30 वाजता सुटणार आहे. तर पहाटे 3 वाजता कल्याणहून सीएसटीकडे लोकल रवाना होणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरही मध्यरात्रीनंतर 3 विशेष फेऱ्या चालणार आहे. यात शेवटची लोकलही पहाटे 2.55 वाजता सुटणार आहे. तर विरारहुनही तीन फेऱ्या सुटणार आहे. विरारहुन शेवटची लोकल पहाटे 2.55 वाजता असणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष फेऱ्या सीएसटी रात्री 1.30 वा. - कल्याण रात्री 3 वा. कल्याण रात्री 1.30वा - सीएसटी रात्री 3 वा. सीएसटी रात्री 1.30वा. - पनवेल रात्री 2.50वा. पनवेल रात्री 1.30वा. - सीएसटी रात्री 2.50 वा. पश्चिम रेल्वे चर्चगेट - 1.15 रात्री चर्चगेट - 1.55 रात्री चर्चगेट - 2.55 रात्री विरार -12.45 रात्री विरार -1.40 रात्री विरार -2.55 रात्री
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: