• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • भीमथडी जत्रेत आदिवासी पाडे, कबीर कॅफे आणि बरंच काही

भीमथडी जत्रेत आदिवासी पाडे, कबीर कॅफे आणि बरंच काही

  • Share this:
3 अद्वैत मेहता,02 मार्च : नोव्हेंबर,डिसेंबरमधील थंडी आणि भीमथडी जत्रा हे गेली 10 वर्षे जुळलेलं समीकरण यंदा नोटबंदीमुळे कोलमडून गेलं आणि कडक उन्हाच्या झळा सुरू झाल्या असताना यंदा भीमथडी जत्रा सुरू झाली.2 ते 5 मार्च या कालावधीत रेंज हिल्स भागात सिंचननगर मैदानावर ही जत्रा भरलीय. या जत्रेत आदिवासी नृत्य ,तारपा नृत्य,हलगी वादन ,ढोलताशे अशा लोककला ,कबीराचे दोहे अशा सांस्कृतिक वातावरणाला मासवड्या,हुरड्याची धपाटी, भजी, पिठलं भाकरी, ठेचा ,खापरावरच्या।पुरपोळ्या, खान्देशी भरीत याच सोबत चुलीवरचं मटण, गावरान चिकन, खेकडा सूप अशा शाकाहारी,मांसाहारी रुचकर पदार्थांची लज्जत चाखता येणार आहे. महाराष्ट्रातील आणि 8 राज्यातील सुमारे 350 महिला बचत गटांचे स्टॉल्स या जत्रेत आहेत.साड्या, पर्सेस, गृहपयोगी वस्तू यासोबत रासायनिक खते न वापरता तयार केलेला शेतमाल,धान्य याची खरेदी ग्राहकांना करता येणार आहे.यंदा आदिवासी थीम असल्यानं जंगलातील मध, त्याच सोबत वारली कला आणि तारपा वाद्य अशी आदिवासी वैशिष्ट्यं असलेल्या वस्तूही खरेदी करता येणार आहेत. 2कॅशलेस खरेदी करता swipe मशीन, पेटियम सुविधेची व्यवस्था आहे.शनिवार रविवार अर्थात वीकेंडला उसळणारी गर्दी पाहता वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या उदभवू नये याकरता 5 एकर जागेवर पार्किंग, उबर या खाजगी टॅक्सी कंपनीसोबत केलेला करार उपयोगी पडणार आहे.4 दिवसात 2 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होईल. तसंच हेल्थ कॉन्शस लोकांकरता थेट शेतातील केेमिकल खतं न वापरता तयार केलेलं धान्य,शेतमाल खरेदी करता येणार आहे.त्यामुळे येत्या वीकेंडला पुण्यात असाल किंवा पुण्यात ट्रिप प्लँन असेल तर भीमथडी जत्रेला भेट देणं चुकवू नका.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: