• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • फर्ग्युसन आणि हिस्लॉप कॉलेजला 'हेरिटेज'चा दर्जा

फर्ग्युसन आणि हिस्लॉप कॉलेजला 'हेरिटेज'चा दर्जा

  • Share this:
fergusson and hislop college nagpur06 जुलै : शेकडो वर्षांपासून शिक्षणाचा कार्य करणार्‍या शिक्षण संस्थांचं जतन करण्यासाठी हेरिटेज दर्जा देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने घेतलाय. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला हेरिटेजचा दर्जा मिळालाय.

अतिशय जुनं आणि नावाजलेलं कॉलेज म्हणून फर्ग्युसन कॉलेज प्रसिद्ध आहे. 1892 मध्ये या कॉलेजच्या इमारतीचं भूमीपूजन करण्यात आलं. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, न्या. रानडे हे या पुरातन महाविद्यालयाचे संस्थापक होते. या कॉलेजची इमारत अतिशय जुनी आणि देखणी आहे. हेरिटेज स्पेशल स्कीम कॉलेजेससाठी देशभरातून 60 महाविद्यालयांनी अर्ज केले होते. त्यातून 19 महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. या महाविद्यालयांना विशेष अनुदान देण्यात येणार आहे.

तसंच 132 वर्षं पुर्ण झालेल्या हिस्लॉप कॉलेजला हेरिटेजचा दर्जा मिळाल्यानं नागपुरचं नाव देशपातळीवर आलं आहे. देशभरातल्या 19 कॉलेजेस पैकी हिस्लॉप हे एक आहे. महाविद्यालयातल्या अनेक विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी बजावलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: