• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • पडलेली घरं, मातीचा ढिगार आणि आक्रोश...

पडलेली घरं, मातीचा ढिगार आणि आक्रोश...

  • Share this:

nepal new26 एप्रिल : नेपाळमध्ये भूकंपानंतर आता बचावकार्य सुरू आहे. कालपर्यंत जिथे इमारती होत्या, आता तिथे फक्त मातीचे ढिगारे उरलेत. उखडलेले रस्ते, सर्वत्र आक्रोश, मृतदेहांचा ढिग आणि जखमींचे खचलेले चेहरे...मन सुन्न करणारं वातवरण पाहण्यास मिळत आहे.

इमारती जमीनदोस्त झाल्यामुळे जिकडेतिकडे ढिगार जमा झालाय. आता हे ढिगारे उपासणं हे महत्त्वाचं काम सध्या सुरू आहे. या ढिगार्‍याखाली काहीजण गाडले गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे जेसीबी मशीन्सनं अत्यंत सावधानपूर्वक हे काम केलं जातंय.

या ढिगाराखालून आपलं कुणी सुखरूप आहे का याची चिंता नागरीकांना लागलीये. तर या भूकंपातून बचावलेल्या नागरिकांनी आणि पर्यटकांनी मोकळ्या मैदानात आसरा घेतलाय. सुट्‌ट्यांचा मौसम असल्यानं इथे पर्यटकांची भरपूर गर्दी आहे.

आपल्या कुटुंबीयांसह आलेल्या पर्यटकांनी रात्रही मैदानातच घालवलीये. दरम्यान, भूकपानंतरच्या हादर्‍यांमुळे भारतानं मदतकार्य 4 वाजेपर्यंत स्थगित केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेतीन वाजता तातडीची बैठक बोलावलीये. त्या बैठकीनंतर मदतकार्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: