• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • निर्भयाचा अल्पवयीन गुन्हेगार बाहेरच राहणार, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

निर्भयाचा अल्पवयीन गुन्हेगार बाहेरच राहणार, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

  • Share this:

nirbhya case 221 डिसेंबर : निर्भया बलात्कार प्रकरणाताली अल्पवयीन गुन्हेगार बाहेरच राहणार आहे. त्याच्या सुटकेविरोधात दिल्ली महिला आयोगानं याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या प्रकरणातल्या अल्पवयीन गुन्हेगाराला मोठा दिलासा मिळालाय.

या प्रकरणात सर्व काही कायद्यानुसारच झालंय, त्यामुळे अल्पवयीन आरोपीला यापुढेही सुधारगृहात ठेवता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला रविवारी सुधारगृहातून सोडण्यात आलं होतं. सध्या तो दिल्लीतल्या एका स्वसंयेवी संस्थेच्या ताब्यात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: