• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • नरसिंग यादव तिसर्‍यांदा 'महाराष्ट्र केसरी'

नरसिंग यादव तिसर्‍यांदा 'महाराष्ट्र केसरी'

  • Share this:

NARSINGH YADAV- kesari winner04 डिसेंबर : मुंबई उपनगरच्या नरसिंग यादवने महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात इतिहास घडवलाय. भोसरी इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबई उपनगरच्या सुनिल सांळुखेचा पराभव करीत सलग 3 वर्ष प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरी किताब जिंकत नरसिंगने विजेतेपदाची विक्रमी हॅट्ट्रिक साधलीय.

महाराष्ट्र केसरी कुस्ती सध्याच्या इतिहासात आजवर सलग 3 ही वेळा महाराष्ट्र केसरी किताब कुणालाही जिंकता आलेला नाहीये. या विजेतेपदाचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे नरसिंग यादव मॅटवरचा पैलवान आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा या मॅटवरचं खेळवल्या जातात.

त्यामुळे नरसिंगच्या या यशामुळे महाराष्ट्रातील मॅटवरच्या कुस्तीला प्रोत्साहन मिळणार आहे. या विजेतेपदासाठी नरसिंगला गृहमंत्री आर.आर.पाटील आणि स्पर्धा संयोजक महेशदादा लांडगे यांच्या हस्ते चांदीची गदा आणि स्कॉर्पियो गाडी देण्यात आली. तर उपविजेता ठरलेल्या मुंबई उपनगरच्या सुनिल सांळुखेला बुलेट देण्यात आली.

First published: