• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • दुष्काळामुळे मराठवाड्यातल्या मच्छीमारांची होतीये उपासमार !

दुष्काळामुळे मराठवाड्यातल्या मच्छीमारांची होतीये उपासमार !

  • Share this:
राजेंद्र हुंजे, उस्मानाबाद 24  एप्रिल :  उस्मानाबादमध्ये जवळपास सगळी धरणं आटली आहेत. त्यामुळे धरणातल्या पाण्यावर मासेमारी करणार्‍यांवर सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. Marathwada asdas उस्मानाबाद येथील नळदुर्ग येथे बोरी धरण आहे. गेल्या तीन-चार वर्षातल्या सततच्या दुष्काळामुळं धरणातल्या पाण्यावर आणि मासेमारी करणार्‍या मच्छिमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. धरणाच्या पात्रात मासेमारीसाठी फिरणार्‍या बोटी किनार्‍याला लागूनआहेत. दोन- तीन वर्षांपासून मासेमारी बंद असल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा हा प्रश्न मच्छिमारांसमोर पडला आहे. पूर्वी जेव्हा पावसाळा चांगला असायचा तेव्हा दिवसाला मासेमारी करून दिवसाला काहीतरी उत्पन्न पदरात पडायचं. पण आता गावात काय करायचं, या विवंचनेत इथला मच्छिमार अडकला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मासेमारी करणार्‍यांची हीच अवस्था आहे. गावाकडच्या निरनिराळ्या व्यवसायांवर दुष्काळाचे दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत. हे वास्तव बदलण्यासाठी आता सूक्ष्म नियोजनाची गरज आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: