• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • तुकोबारायांच्या पालखीचं आज दुपारी होणार पंढरपूरकडे प्रस्थान

तुकोबारायांच्या पालखीचं आज दुपारी होणार पंढरपूरकडे प्रस्थान

  • Share this:

wari ringan08 जुलै : आषाढी वारीला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. संत तुकाराम महाराजांची पालखीचं आज (मंगळवारी) दुपारी देहूमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.

यंदा वारीचं हे 330वं वर्ष आहे. त्याच निमित्ताने सुमारे 330 दिंड्या या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. आज सकाळपासूनच या दिंड्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास सुरूवात केली आहे. तुकोबांची पालखी आज दुपारी साडे तीन वाजता इनामदार वाड्याहून प्रस्थान करेल. तसंच पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज दुपारी 12 वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. तुकारामांच्या पालखी प्रस्थानाच्या पूर्वसंध्येला देहूत वारकर्‍यांचा उत्साह पाहायला मिळाला. इंद्रायणी नदी काठी जमलेले वैष्णवगण तुकोबांच्या जयघोषात तल्लीन झाले होते. यासाठी

दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. दोन पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक आणि पाचशे ते सातशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. देहू मंदिरात 32 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: