• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • टोलप्रश्नामुळे पोलिसांचं सँडविच झाले - आर.आर.पाटील

टोलप्रश्नामुळे पोलिसांचं सँडविच झाले - आर.आर.पाटील

  • Share this:

Image img_234472_rrpatil34_240x180.jpg09 फेब्रुवारी :  टोलप्रश्नामुळे पोलिस दलाचे सँडविच झाले असून टोल प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे असे मत राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केले. टोलविरोधात हिंसक आंदोलन करणा-यांवर कारवाई करु असा इशाराही त्यांनी दिला.

रविवारी गृहमंत्री आऱ.आर.पाटील कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीमध्ये गुरुदत्त शुगर्सच्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. टोलप्रश्नी कोल्हापूरच्या जनतेच्या तीव्र भावना असल्याचं मान्य करत गृहमंत्र्यांनी आयआरबी कंपनीच्या परतफेडीसाठी महापालिकेनंच ठोस निर्णय घ्यावा असंही म्हटलं आहे.

मात्र आर. आर. यांच्या वक्तव्यामुळं पोलिसांचे होणार हाल समोर आले आहेत. कारण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूरमध्ये आयआरबी कंपनीला निशुल्क पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस कोल्हापूरच्या टोलनाक्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्याच बरोबर, काल एका भाषणा दरम्यान,'मोदींना भेटण्यात गैर ते काय?'असं म्हणत मोदी आणि आपल्या भेटीची कबुली खुद्द शरद पवारांनी दिली. त्यावर, काही भेटी नाकारल्या जाऊ शकत नाहीत अशी प्रतिक्रीया आर.आर. पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, चंदगड दगडफेकप्रकरणी दोषी पोलिसांवर लवकरच कारवाई करणार असल्याचं आश्वासन आर. आर. पाटील यांनी कोल्हापुरात दिले. चंदगड पोलीस ठाण्यावर काल झालेल्या दगडफेकीनंतर आज चंदगडचे पोलीस निरीक्षक फूलचंद चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. परिस्थिती नीट न हातालल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

First published: