• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • झूम प्रकल्पामुळे कोल्हापुरातले नागरिक त्रस्त

झूम प्रकल्पामुळे कोल्हापुरातले नागरिक त्रस्त

20 डिसेंबर कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेनं कच-यांची विल्हेवाट लावण्यासाठी झूम प्रकल्प सुरू केला होता.आता या प्रकल्पात कचरा तसाच पडून राहिला आहे. कुजलेल्या कच-यामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. यावर आमचे सिटीझन जर्नलिस्ट प्रदीप राणेंचा रिपोर्ट.झुम प्रकल्पामधील कचरा दररोज पडलेला असतो. कचरा साठल्यामुळे त्याला दुर्गंधी येत असते. त्यामुळे इथून जी हवा येते त्याबरोबर कच-याच्या घाणीचा वासही आमच्या घरामध्ये येत असतो. हवेतील धूळीमुळे इतकी घाण येते की वरचेवर आम्हाला घर साफ करावं लागतं. कोण्या पाहुण्याला घरी बोलवायचं म्हटलं तरी आम्हाला मोठा प्रॉब्लेम येतो. इथले नागरिक सांगतात, या झूम प्रकल्पाचा फार त्रास होतो. कच-याच्या दूषित वा-यामुळे आमचं, मुलाचं आरोग्य बिघडत आहे. पण कुणालाही आमच्या आरोग्याचा विचार नाही. कच-यामुळे या परिसरात भटकी कुत्री मोठया प्रमाणात फिरतात. भटकी कुत्री असल्यामुळे या भागात लहान मुले यायला जायला घाबरतात. लहान मुलांना खेळायलाही जागा नाही. असं असलं तरी प्रशासन म्हणतं, पहिला इथे झूम प्रकल्प आला त्यानंतर घरं बांधण्यात आली. पण नागरिकांचं म्हणणं वेगळंच आहे. ते म्हणतात, आम्ही इथे आलो तेव्हा इथली जमीन सपाट होती. कच-याची जागा दुसरीकडे होती. नागरिकांना होणार त्रास पाहता आता प्रशासनाने झूम प्रकल्प दुसरीकडे नेण्यात यावा असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.

  • Share this:

First published: