• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • जसवंत सिंगांनी भाजपविरोधात थोपटले दंड, अपक्ष म्हणून रिंगणात

जसवंत सिंगांनी भाजपविरोधात थोपटले दंड, अपक्ष म्हणून रिंगणात

  • Share this:

jaswant singh424 मार्च : लोकसभा निवडणुकीत मनासारखी उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांनी पक्षाविरोधात दंड थोपाटले असून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. जसवंत सिंग यांनी बारमेरमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

पक्षानं तिकीट नाकारल्यामुळे नाराज जसवंत सिंहांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला. पक्षानं दिलेल्या वागणुकीमुळे आपले समर्थक नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. तर पक्ष सोडण्यासंबंधीचा निर्णयही तेच घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. जसवंत सिंग यांनी आपण लोकसभेची शेवटची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत बारमेर मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

पण पक्षांने त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यांना बारमेरमधून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे जसवंत सिंह यांनी पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षात आता असली भाजप विरुद्ध नकली भाजप अशी फळी पडलीय. त्यामुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं सिंग यांनी जाहीर केलं. सिंग यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलीय. आता सिंग यांची भाजपमधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे पण जसवंत सिंग सारख्या ज्येष्ठ नेत्यावर कारवाईसाठी भाजप नेतेही बुचकळ्यात सापडले आहे.

First published: