• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • जम्मू-काश्मीरमध्ये सर्व पर्याय खुले-अमित शहा

जम्मू-काश्मीरमध्ये सर्व पर्याय खुले-अमित शहा

  • Share this:

amit_shah423 डिसेंबर :  जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपसमोर सर्व पर्याय खुले असल्याचं भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलंय. झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत आणि जम्मू-काश्मीरमध्ये घवघवीत यश मिळाल्यानं अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला.

काँग्रेसमुक्त भारताचं नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं भाजपची घोडदौड सुरू असल्याचं ते म्हणाले. तसंच दोन्ही राज्यांत भाजपला मिळालेलं यश म्हणजे मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांनी दिलेला प्रतिसाद आहे, झारखंडमध्ये चांगलं सरकार देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमित शहा यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

जम्मू-काश्मीरमध्ये सर्व पर्याय खुले-अमित शहा झारखंडच्या जनतेनं जनता परिवार आणि काँग्रेसला नाकारलंय -अमित शहा झारखंडमध्ये भाजपला 18 जागा होत्या आज आम्ही 41 जागांपर्यंत पोहोचलो -अमित शहा झारखंड आणि जम्मू-काश्मिरमधल्या जनतेचे अमित शहांनी मानले आभार झारखंडमध्ये चांगलं सरकार देऊ, अमित शहांनी व्यक्त केला विश्वास चारही राज्यात काँग्रेसची पिछेहाट काँग्रेस तिसर्‍या किंवा चौथ्या जागेवर काँग्रेसमुक्त अभियान असंच सुरू राहिलं आणि ते आणखी पुढे जाईल -अमित शहा मोदी सरकराचं काम आणि मोदीवरचं लोकांचं प्रेम याचा या विजयात मोठा वाटा -अमित शहा महाराष्ट्रात पहिल्यांचा भाजपचा मुख्यमंत्री-अमित शहा झारखंडच्या स्थापनेनंतर जनतेनं पहिल्यांदा पूर्ण बहुमत दिलं आणि आता भाजपच सरकार झारखंडमध्ये बनतंय- अमित शहा

=================================================================================== सोनावार मतदारसंघात ओमर अब्दुल्लांचा पराभव पीडीपीच्या मोहम्मद अश्रफ मीर यांनी केला ओमर अब्दुल्लांचा 5000 मतांनी पराभव

काश्मीरमध्ये त्रिशंकू, कोण ठरणार किंगमेकर ? पीडीपीची 29 जागांवर सरशी तर भाजप 25 जागांवर पुढे पीडीपी कुणाचा पाठिंबा घेणार? भाजप अस्पृश्य नाही- पीडीपी नेते मुझफ्फर बेग यांचं वक्तव्य झारखंडमध्ये भाजपला सर्वात जास्त जागा झारखंडमध्ये भाजप 39 तर झारखंड मुक्ती मोर्चा 22 जागांवर पुढे

 काश्मिरमध्ये भाजप आणि पीडीपी युती होण्याची शक्यता गरज पडल्यास भाजपचा पाठिंबा घेण्याची शक्यता पीडीपी नाकारत नाही,पीडीपीच्या प्रवक्त्यांनी केलं स्पष्ट

 काश्मीरमध्ये चालली मोदींची जादू

जम्मू-काश्मीरची वाटचाल त्रिशंकू विधानसभेच्या दिशेनं

 झारखंडमध्ये भाजपचा झंझावात, 50 जागांवर आघाडी

जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये काँग्रेस भुईसपाट

81 पैकी 50 जागांवर आघाडी घेत झारखंड विधानसभेत भाजपला बहुमत

 झारखंडमध्ये भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल

जम्मू काश्मीरमध्ये भाजप 29 जागांवर तर पीडीपी 27 जागांवर आघाडीवर

 जम्मू काश्मीरमध्ये भाजपने टाकलं पीडीपीला मागे, 30 जागांवर घेतली आघाडी

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समधला तणाव वाढला- सूत्र

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला 30, भाजपला 26 तर नॅशनल कॉन्फरन्स 13 जागांवर आघाडी

काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप रस्सीखेच

 झारखंड : भाजपची सुरुवातीला मुसंडी, काँग्रेस आणि झामुमोची पीछेहाट भाजप -26, काँग्रेस -2, झामुमो -5

- जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला 18, भाजपला 13 तर नॅशनल कॉन्फरन्स 2 जागांवर आघाडी

झारखंडमध्ये भाजप आघाडीवर

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला 13, भाजपला 7 तर काँग्रेस 2 जागांवर आघाडी

» झारखंडमध्ये भाजप 5 जागांवर तर इतर 1 जागांवर आघाडीवर

» जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी 4 जागांवर तर भाजप 3 जागांवर आघाडीवर

» जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर

» जम्मू- काश्मीर आणि झारखंडमध्ये पहिला कल भाजपच्या बाजूनं

==================================================================================================

काश्मीरमध्ये मोदींची जादू, पण विधानसभा त्रिशंकू

भारताच्या नंदनवनात अर्थात काश्मीरमध्ये सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचं पानिपत झालं आहे. जम्मू आणि काश्मिरमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पीडीपी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. पीडीपीने 26 जागांवर आघाडी घेतली आहे. तर त्यापाठोपाठ मोदींची जादू इथंही पाहण्यास मिळालीये. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 25 जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी असलेल्या नॅशनल काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर असून चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. सध्या सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे पीडीपी सरकार बनवण्याकडे वाटचाल करत आहे. पण बहुमताचा आकडा अजूनही दूरच आहे. दरम्यान, गरज पडल्यास भाजपचा पाठिंबा घेण्याची शक्यता नाकारत नाही अशी सुचक प्रतिक्रिया पीडीपीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी दिली.

==================================================================================================

झारखंडमध्येही नमो..नमो, भाजपची बहुमताकडे वाटचाल

‘सबका साथ सबका विकास’, ‘अच्छे दिन आयेंगे’ आणि विकासाचं आश्वासनं देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट पुन्हा एकदा झारखंडमध्ये दिसून आली. झारखंडमध्ये भाजप मोदी लाटेवर स्वार झाली असून काँग्रेस, जेएमएमचा धुव्वा उडवत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. झारखंडमध्ये 81 जागांसाठी आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून भाजपने आघाडी घेतली ती आतापर्यंत कायम आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 39 जागांवर मुसंडी मारलीये. तर जेएमएमने 21 जागांवर आघाडीवर असून दुसर्‍या स्थानावर आहे. तर काँग्रेस तिसर्‍या स्थानावर फेकली गेली असून 8 जागांवर आहे. तर अपक्षांनी 5 जागा पटकावल्या आहेत. आकाड्यांचा चढउतार सुरूच आहे. पण झारखंडमध्ये पहिल्यांदाच पूर्ण बहुमतात सरकार येणार हे जवळपास निश्चित झालंय. झारखंडमध्ये भाजप नेहमी सर्वात मोठा पक्ष म्हणून आतापर्यंत समोर आला आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुका आणि स्वतंत्र्य राज्यानंतर विधानसभा निवडणुकीतही भाजपने मुसंडी मारली होती. पण युती करूनच सरकार स्थापन करता आलं. 2005 च्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 30 जागा पटकावल्या होत्या. 2009 मध्ये भाजप आणि जेएमएमने 18-18 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला होता आणि युतीचे सरकार स्थापनही केलं होतं. पण जेएमएमच्या दबावामुळे युती तुटली आणि सरकार बरखास्त झालं. पुढे जेएमएमने काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं. पण आता केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर झारखंडमध्ये बहुमताकडे झेप घेतलीये.

==================================================================================================

 काँग्रेसची पुन्हा हाताची घडी तोंडावर बोट !

लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं गेलेल्या काँग्रेसची परिस्थिती अजूनही काही सुधारलेली नाही. जम्मू काश्मीर आणि झारंखडमध्ये मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसला नाकारून चांगलाच धक्का दिलाय. दोन्ही राज्यात काँग्रेसचा पराभव झालाय. काश्मीरमध्ये काँग्रेसने कसाबसा दुहेरी आकडा गाठला तर झारखंडमध्ये सुपडा साफ झालाय. त्यामुळे पुन्हा काँग्रेसला हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्याची वेळ आलीये. लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र, हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. यूपीए सरकारने सलग दोन टर्म सत्ता उपभोगली खरी पण लोकसभेच्या रणांगणात मोदी लाटेपुढे यूपीएचं ‘जहाज’ तळाला लागलं. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत दिल्लीचे तख्त राखले. काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षाची जागाही मिळाली नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसचं पानिपत झालं. 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला जनतेनं स्पष्ट नकार देत ‘घरचा रस्ता’ दाखवला. आज जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. इथं मोदी मॅजिकपुढे काँग्रेस गारद झाली. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला 12 जागा मिळाल्यात तर झारखंडमध्ये 9 जागांवर समाधान मानावे लागले. 2009 च्या निवडणुकीत काश्मीरमध्ये काँग्रेसला 17 जागा पटकावल्या होत्या तर झारखंडमध्ये 21 जागा जिंकल्या होत्या. मागील निकाल पाहता काँग्रेसला चांगलाच पराभवाचा धक्का बसलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: