• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • 'गुलाब गँग'वरची बंदी उठली, उद्या रिलीज

'गुलाब गँग'वरची बंदी उठली, उद्या रिलीज

  • Share this:

gulab gang 4506 मार्च : अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला गुलाब गँगचा रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दिल्ली कोर्टाने घातलेल्या बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असून उद्या गुलाब गँग सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

गुलाब गँग सिनेमा आपल्यावर आधारीत असून आपली परवानगी घेतली नाही असा आरोप खर्‍या गुलाबी गँगच्या प्रमुख संपत पाल यांनी केला होता. मध्यंतरी गुलाब गँगच्या टीमने संपत पाल यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गुलाब गँग सिनेमा संपत पाल यांच्या आयुष्यावर आधारीत नाही. फक्त नाव हे त्यांच्या संघटनेशी मिळतं जुळतं आहे अशी बाजू दिग्दर्शकांनी मांडली.

पण संपत आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. संपत पाल यांनी थेट कोर्टाचे दार ठोठावले. दिल्ली कोर्टाने संपत पाल यांच्या आक्षेपाला मान्य करत गुलाब गँगवर 8 मेपर्यंत देशभरात बंदी घातली. मात्र गुलाब गँगच्या दिग्दर्शकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. आता उद्या गुरुवारी सिनेमागृहात गुलाब गँग रिलीज होणार आहे.

First published: