• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • गरज पडल्यास निवडणूक पुढे ढकला- गोपीनाथ मुंडे

गरज पडल्यास निवडणूक पुढे ढकला- गोपीनाथ मुंडे

  • Share this:

Image img_159642_gopinathmunde4_240x180.jpg'गरज पडल्यास निवडणूक पुढे ढकला पण गारपीटग्रस्तांना मदत देण्यात हयगय नको, अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांची आजचा सवाल या कार्यक्रमात केली आहे. तर नागपूरच्या 'जन-जनशक्ती मोर्चा'नेही गारपीटग्रस्तांसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली निवडणूक तारखांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी काल रात्रभर नांदेड जिल्ह्यातल्या 15 गारपीटग्रस्त गावांचा दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी माळेगावातील एका मृत शेतकर्‍यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचं सात्वन केलं. यानंतर मुंडेंनी लोहा, गोडज, माळकोडी या गावांमधल्या शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. विशेष म्हणजे मुंडे यांनी मध्यरात्री शेतात जाऊन बॅटरीच्या उजेडातच नुकसान झालेल्या पिकांची पाहणी ही केली. सध्या निवडणुकीचं वातावरण असल्यानं सर्वच राजकीय मंडळी आपल्या सोयीनुसारच या गारपीटग्रस्त भागाला भेट देत आहेत मात्र शेतकर्‍यांच दु:ख समजुन घेण्यासाठी हा दौरा गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं. या आधी, 'सरकारनं जर त्वरित मदतीसाठी पाऊलं उचलली नाहीत, तर रस्त्यांवर उतरू', असा इशारा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.

First published: