• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • केजरीवालांना तरुणाने लगावली थप्पड

केजरीवालांना तरुणाने लगावली थप्पड

  • Share this:

M_Id_463433_Arvind04 एप्रिल : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला. दिल्लीतल्या दक्षिणपुरी भागात केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. केजरीवाल प्रचार रॅली आटोपून परतत असताना ही घटना घडली. केजरीवाल जीपवरून प्रचार करत असताना अचानक आलेल्या एका तरुणाने थप्पड लगावली.

अब्दुल वाहिद असं त्या तरुणाचं नाव आहे. केजरीवाल यांच्यावर हल्ल्यानंतर 'आप' च्या कार्यकत्यांनी या तरुणाला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. वाहिद कोणत्या पक्षाचा आहे का ? हा हल्ला का करण्यात आला याची चौकशी पोलीस करत आहे. पण गेल्या पंधरा दिवसात केजरीवाल यांच्यावर हा तिसरा हल्ला आहे. वाराणसीमध्ये रोड शो करत असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.

त्याबरोबरच हरियाणामध्येही त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे गृहखात्याने केजरीवाल यांना सुरक्षा पुरवण्याचा प्रस्ताव दिला होता पण केजरीवाल यांनी सुरक्षा नाकारली होती.

First published: