• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • काँग्रेसकडून निवडणुकीला जातीयवादाचं स्वरूप -मोदी

काँग्रेसकडून निवडणुकीला जातीयवादाचं स्वरूप -मोदी

  • Share this:

narendra_modi_hariyana03 एप्रिल : काँग्रेस निवडणुकीला जातीयवादाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवारी) हरियाणातल्या कुरूक्षेत्र इथं सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शाही इमामांच्या भेटीचा त्यानी चांगलाच समाचार घेतला. जातीयतेच्या नावावर मतांसाठी आवाहन करणे हे निवडणुकीच्या नियमाच्या विरोधात आहे. पण यावर कुणी आक्षेप घेत नाही. काँग्रेस सरकारने पहिले देशाचे तुकडे केले, जनतेमध्ये फूट पाडली आणि देशासाठी जीवाची बाजी लावणार्‍या सैनिकांमध्येही व्होट बँकसाठी फूट पाडण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे असा आरोपही मोदींनी केला.

तसंच आम्ही देशभरात विकासबद्दल चर्चा करत आहे, महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत आहोत, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलत आहोत पण काँग्रेस यावर चर्चा करण्यापासून दूर पळत आहे. त्यांच्याकडे याची उत्तर नाही असंही मोदी म्हणाले. तसंच मी तुमच्या तिजोरीचा चौकीदार आहे या मोदींच्या वक्तव्यावर राहुल गांधींनी टीका केली होती त्याला मोदींनी उत्तर दिलंय. जमिनीचा घोटाळा करणारे रॉबर्ट वडरा हे काय चौकीदार होणार असा सवाल मोदींनी उपस्थितीत केलाय.

First published: