• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • 'एकटा पडलाय राजा, राजाला साथ द्या'

'एकटा पडलाय राजा, राजाला साथ द्या'

  • Share this:

raj_mns_song01 फेब्रुवारी :  एकीकडे 'टाळी'साठी मनसेचे धडपड अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. पण 'टाळी' काही मिळाली नाही. आता निवडणुकीत मनसेचं काय होणार ? अशी चर्चा रंगली असताना  'एकटा पडलाय राजा, राजाला साथ द्या' असं साद घालणारं गाणंच मनसेनं जाहीर केलंय.

दादर इथं शिवाजी मंदिरात झालेल्या मेळाव्यात 'एकटा पडलाय राजा, राजाला साथ द्या' हे गाणं प्रसिद्ध करण्यात आलं. खुद्द राज ठाकरे यांच्या उपस्थिती हे गाण प्रसिद्ध झालं हे विशेष. अवद्धुत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या आवाज हे गाणं रेकाॅर्ड करण्यात आलंय. व्यासपीठावर या दोन्ही गायकांनी गाणं सादर करत मनसेसैनिकांची मन जिंकली. पण, मनसेची आतापर्यंतची घोडदौड पाहता मनसेनं आपली भूमिका प्रांजळपणे कबूल करत सर्व भार पक्षाचा 'राजा' अर्थात राज ठाकरे यांच्या सोपवली असून आता 'राजाला साथ द्या' अशी साद घातलीये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: