• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • उद्योगपती व्हायचं ?, 'स्टार्ट अप इंडिया' योजनेचा झाला शुभारंभ

उद्योगपती व्हायचं ?, 'स्टार्ट अप इंडिया' योजनेचा झाला शुभारंभ

  • Share this:

startupinidaनवी दिल्ली - 16 जानेवारी : आता या पुढे देशातील तरुणांना काम शोधावे नाही लागणार उलट ते जॉब निर्माण करतील असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी) केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'स्टार्ट अप इंडिया' योजनेचं उद्घाटन केलं. दिल्लीतील विज्ञान भवनात हा उद्घाटन सोहळा पार पडला. तरूणांनी धाडस आणि जोखीम घेण्याची सवय केली पाहिजे. आयटीच्या चौकटीबाहेर विचार करून सायबर सुरक्षेसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये तरूणांनी संशोधन करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'स्टार्ट अप इंडिया'च्या हस्ते योजनेचं उद्घाटन पार पडलं. आमच्या इथं बिलियन समस्या आहे आणि बिलियन माईंड सुद्धा आहे. स्टार्ड अप इंडिया योजनेला आपण 'स्टँड अप इंडिया' असंच मानतो. ही योजना उपायकारक असून पुढील तीन वर्ष या योजनेचं निरीक्षण करण्याची आवश्यकता नाही असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. या योजनेत पेटेंट घेण्यासाठीच्या फीमध्ये 80 टक्के सूट देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 एप्रिलपासून मोबाईल ऍप आणि पोर्टल सुद्धा सुरू करण्यात येईल. तसंच जे उत्पन्न मिळेल त्यावर 3 वर्षं इन्कम टॅक्सची सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्टार्ट अपसाठी 10 हजार कोटींचा फंडही उभारला जाणार आहे असंही मोदींनी सांगितलं.

'स्टार्ट अप'निमित्तानं केल्या महत्त्वाच्या घोषणा

1 एप्रिलपासून मोबाईल ऍप, पोर्टल -पंतप्रधान उद्योगांसाठी तरुणांना मिळणार आर्थिक मदत पेटंटच्या फीमध्ये 80 टक्के कपात जे उत्पन्न मिळेल त्यावर 3 वर्षं इन्कम टॅक्स नाही 'स्टार्ट अप' उद्योगाचं 3 वर्षं इन्स्पेक्शन नाही 'स्टार्ट अप'साठी 10 हजार कोटींचा फंड सार्वजनिक आsिण सरकारी खरेदीत 'स्टार्ट अप'ला सूट 'स्टार्ट अप'च्या माधमातून संशोधनाला प्रोत्साहन

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: